भाषेतील रस
भाषेतील रस रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो. साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते. मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात. साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते. १) स्थायीभाव - रती रसनिर्मिती – शृंगार हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका. २) स्थायीभाव – उत्साह रसनिर्मिती - वीर हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ ३) स्थायीभाव –शोक रसनिर्मिती –