जोड शब्द व त्याचे अर्थ

जोड शब्द व त्यांचे अर्थ

जोड शब्दअर्थ
अकट चिकटचोखंदळ
अकट विकटअतिशय मोठा
अकडं तिकडंअव्यवस्थित
अकरनकरहट्टी, दुराग्रही
अकराळ विकराळभयंकर (अक्राळ विक्राळ)
अकांड तांडवरागाने ओरड
अक्कल बाजहुशार
अगट चिगटमंद, आळशी
अगड तगडक्षुल्लक वस्तू (सटरफटर)
अगड तबडशिळेपाळे, जाडे भरडे अन्न
अगल्या बगल्याआश्रित
अग्निपरीक्षाअग्निदिव्य
अगापिछासंबंधी
अग्निपात्रइस्त्रीचे यंत्र
अग्नियंत्रबंदूक, तोफ
अघळ पघळऐस पैस, सैल
अंगत पंगतमुलांचा एकत्र जेवणाचा प्रकार
अचकट विचकटवाईट, अश्लील
अचक बोचकगैर पद्धतीने, अस्ताव्यस्त
अचकल दचकलवाईट अन्न
अचका विचकागोंधळ, गुंतागुंत
अचका गचकाधसका, अपस्मार, फेफरे यांनी बसणारा हिसका
अचट बोचटअर्धे मुर्धे, कमी जास्त
अचडे बचडेलाडके मूल
अचरट पचरटकोरडे, बेचव
अजात शत्रुशत्रू नसलेला
अटक चटकचेष्टा, खेळ
अटक मटकखेळ
अटपा आटपआवराआवर, निरवानिरव
अटाअटवाण, उणीव, टंचाई
अटापीटछळणूक, गांजणूक
अटांग पटांगलांबलचक
अठोनी वेठोनीपीळदार
अटोकाटअत्यंत
अडका अडकीगुंतागुंत, विघ्न
अडगुण बडगुणफालतू वस्तू
अडप झडपचोरून मारून, लपून छपून
अडवा तिडवावाकडा तिकडा, बाकदार
अडगुले मडगुलेमुलांचे गाणे
अडपता दडपतादेखरेख करणारा
अडप दडपधाक, वचक
अडोशी पडोशीजवळपासचा, शेजारचा
अढा वेढाआडकाठी, प्रतिबंध
अढेवेढेवाकडे तिकडे मुद्दे, अळेपिळे
आणिबाणीऐनवेळ अतिशय लहान कण
अणुरेणूदेवघेव, फेरफार
अदलाबदलमोठ मोठे वीर
अतिरथी महारथीसुवासिक फुलांचे सत्व
अत्तर गुलाबजास्तजास्त
अधिकाधिकजास्त कमी
अधिक उणे(अर्धे मुर्धे) कमी जास्त
अर्धा मुर्धालबाडी, घोटाळा
अफरा तफरअव्यवस्थित
अबर गोबरबेचव, नीरस
अबर चबरआळ, आरोप
अभांड कुभांडशांती, समृद्धी
अमन चमनजेवण व पाणी (निर्वाहाचे साधन)
अन्नपाणीबडे लोक
अमीर उमरावकोणी एक
अमूक तमूककोणीतरी व्यक्ती
अयबू गयबूअन्न व कपडे इ.
अन्न वस्त्रआळीपाळी, अदला बदली
अरगी पारगीअवघड जागा, कडा
अरडी दरडीपरडी
अरडी परडीअलीकडे, पलीकडे
अरता परताबेचव, नीरस, रुक्ष
अरब चरबआसपास, आजुबाजूला
अरस परसतात्पुरते
अरळतरळभाषण (तयारी नसलेले भाषण), अप्रस्तुत भाषण
अराळ फराळकोणत्याही रीतीने
अर्था अर्थीकोणीही, भलता सलता
अलबलीत गलबलीतढिला, मंद
अरे तुरेसलगीचे संबोधन
अलांडा बलांडाअडथळा, विघ्न
अलाई बलाईदुःख, त्रास
अवडक चवडकपसारा, गोंधळ
अवड चिवडअव्यवस्थित पसारा
अवडा देवडाअडवा तिडवा, वाकडा तिकडा
अवती भवतीआजुबाजूला
अवळ चवळअर्धवट
अवाई तवाईसंकट
अशीतशीकिरकोळ, क्षुल्लक
अष्टावक्रविद्रूप, कुरूप
अष्ट पुत्रआठ मुले
अष्टमांशआठवा हिस्सा
अष्ट पैलूहुषार, कला जाणणारा
अष्टौप्रहररांत्रदिवस, सतत
असुळ विसुळअस्ताव्यस्त, अव्यवस्थित
अस्ती नास्तीकाय आहे, काय नाही ते
असते नसतेअप्रासंगिक
अहाच वहाचवरवर, दिखाऊ
अहद तहदया टोकापासून त्या टोकापर्यंत
अळा पिळामुरडा, पिरगळा
आखोआखमूळ किमतीने
आखाडखानाशस्त्रागार, तालीमस्वाना
आकाश पाताळसर्वत्र
आगर डोंगरसरहद्द, आवार
आगा पिछामागचा पुढचा भाग
आगत स्वागतसत्कार, पाहुणचार
आंगतपंगत (अंगत पंगत)मुलांचा एकत्र भोजनाचा प्रकार
आई-बापआईवडील, पालक
आगळा वेगळाअप्रतिम
आगे मागेपुढे मागे
आचार विचारनियम, शिस्त
आटक साटकमुलांचा एक खेळ
आटा पिटाखटाटोप
आटिवेटीश्रम, कष्ट
आटेविटेआठेविठे, आळेपिळे
आटपाटठामपणा, पक्केपणा
आटपाटनगरकोणते तरी एक शहर
आटापाणीपीठ व पाणी, रोजचा शिधा
आटोकाटपराकाष्ठेचा, अत्यंत, पूर्ण
आट्या पाट्याएक महाराष्ट्रीय खेळ
आणिबाणीसंकट प्रसंग
आदळ आपटआदळणे व आपटणे, आपटा आपटी
आनंदी आनंदखूप आनंद
आपट धोपटआपटणे, आपटा आपटी
आंबट गोडआंबट व गोड यांचे मिश्रम
आबड धाबडओबड धोबड, बेडौल
आबळा गोबळासर्व दिशास व्यापून असणारा
आबादी आबादभरभराट
आंबट चिंबटआंबट
आयात निर्यातआवक जावक
आयाबायाशेजारणी पाजारणी
आवड निवडपसंती, आवड नावड
आमने सामनेसमोरा समोर
आवळे जावळेजुळे
आरोह-अवरोहचढ-उतार
आलीगेलीनफातोटा, जमाखर्च
आवट चावटभसते सलते
आवती भोवतीआजूबाजूला, आसपास
आस्कळ विस्कळऐसपैस
आस्कार हुस्कारहुंदके देणे, श्वासोच्छ्वास
आशानिराशाइच्छा-अनिच्छा
आहाळबाहाळसंपूर्ण, विस्तीर्ण
आळसमळसऐसपैस
आळाटाळीढिलाई, चेंगटपणा
आळाटोळाअंदाज
इकडे तिकडेआजुबाजूला, येथेतेथे
इवले इवलेलहान
इन मिन साडेतीनछोटा संसार
इमाने इतवारेप्रामाणिकपणाने, एकनिष्ठेने
इडा पिडादुःखे, संकटे
उकसाबुकसीओक्साबोक्षी
उखळा उखळविस्कटणे, मोकळे करणे
उखाळी पाखाळीवैगुण्य, दोष, कमीपणा
उगरा बागराउग्र, क्रूर, भयानक
उगवित पागवितसोईसोईने, थोडेथोडे
उघडा बोडकाखुला, मोकळा, नागवा
उघड वाघडउघडपणे, प्रसिद्धपणे
ऊचकळ्या बुचकळ्याबुडत्या माणसाच्या पाण्यातील गटांगळ्या
उचका उचकघाईने ओढणे, फसविणे
उचमपचमउठाठेव
उचलबांगडीहकालपट्टी करणे
उचला उचलघाईने सामानाचे स्थलांतर करणे
उजळ पाजळस्वच्छ, सतेज
उजवा डावाफरक
उजूबुजूआदर, मान, मर्यादा
उटाउटीउठाउठी, तात्काळ, त्वरेने
उठसूटकारणाशिवाय करण्याची क्रिया
उठाठेवखटपट
उडतउडतअस्पष्टपणे
उडवा उडवीटाळाटाळी, उधळपट्टी
उतळपातळगप्पा, प्रौढी
उत्तमोत्तमउत्कृष्ट
उत्तरोत्तरक्रमाक्रमाने, हळूहळू
उतळपातळथोडेथोडे
उन्हातान्हाचाभर दोन प्रहरचा
उधळ माधळउधळेपणा
उधार उसनवारबिनव्याजी कर्ज
उपज निपजजन्म आणि वाढ, उदय आणि प्रगती
उपासतापासकडक व्रत, व्रतनियम
उरलासुरलाशिल्लक राहिलेला
उलगा उलगआवराआवर, समाप्ती
उलाघालउलाढाल, क्रांती
उलटा पालटाउलथा पालथा, गोंधळ
उठता बसतावेळी अवेळी
उष्टे खरकटेजेवणानंतर पानात राहिलेले
उसने पासनेउसनवारी, उधारी
ऊन पाऊससूर्यप्रकाश व पाऊस
ऋषीमुनीसाधूसंत
एकट दुकटएखाद दुसरा, एकटाच
एकनिकीएकी, जूट
एकमेकपरस्पर
एकमेळऐक्य
एकांती लोकांतीगुप्त किंवा प्रकट, खाजगी किंवा सार्वजनिक
एकलकोंडाएकांतप्रिय
एडगुळ बेडगुळओबडधोबड
एरडबेरडबेडौल
ऐशआरामचैन, सुख, ऐष आराम
ऐलपैलया व त्या बाजूचा
ऐलतीर पैलतीरया व त्या बाजूचा किनारा
ऐसपैसविस्तीर्ण, प्रशस्त
ओकसाबोकशीमोठ्याने हेल काढून रडणे
ओघळ निघळवेडा वाकडा प्रवाह
ओढाओढखेचाखेच, गर्दी
ओढाताणपैशाची टंचाई
ओढून ताणूनकसेतरी, कष्टाने
ओबड धोबडवेडेवाकडे, बेढव
ओवळा सोवळाअपवित्र-पवित्र
ओळख पाळरवपरिचय
औडक चौडकओबडधोबड, लहान मुलांचा खेळ
औरस चौरससभोवार, भोवती
औषध उपचारवैद्यकीय उपचार
अंखण पंखणधान्याप्रमाणे पसरणे
अंगकाठीअंगाची ठेवण, देहयष्टी
अंथरूण पांघरूणबिछाना व पांघरायचे वस्त्र
अंधार कोठडीएकांत वासाची शिक्षा देण्याची खोली
अंडाळ बंडाळअव्यवस्था, गैरसोय
कडनिकडनिकडीचा प्रयत्न
कडाफोडआदळ, आपट
कच्ची बच्चीलहान मुले
कडी कोयंडादाराची कडी
कडी कुलपेदाराची कडी व कुलूप
कमी अधिककमी जास्त
कडे लोटशिक्षा म्हणून डोंगर कड्यावरून ढकलणे
कपडालत्ताकापडचोपड, वस्त्र, कापड
कडोकडीजोराने, नेटाने
कमजादाकमी जास्त, कमी अधिक
करार मदारवचन, बोली
कर्मकांडधर्मकर्म
कर्मयोगदैव, योगायोग
कर्मकथादुःखद कहाणी
कर्मकटकटकंटाळवाणे, तापदायक
कर्मसंन्यासकर्माचा त्याग
कर्ण कटूकर्कश, कठोर
कलाकौशल्यकलाकुसर, कलेत नैपुण्य
कर्मधर्मवर्तन, कृत्य
कसाबसामोठ्या कष्टाने, प्रयासाने
कसकसणेअंग दुरवून येणे
कहिबहिकधीमधी, कधीतरी
कागद पत्रपत्र, चिठ्ठी इ.
काऊ-चिऊकावळा चिमणी, लहान सहान
काट कसरकाटाकाट, खर्च कमी करणे
काटे कुटेबारीकसारीक लाकडे, अडथळा
काटेकोरबारीक, सूक्ष्म, व्यवस्थित
काथ्याकूटनिरर्थक चर्चा, वाद
कानाडोळादुर्लक्ष
कानामात्राअक्षर चिन्हे
कांदा भाकरीजेवण, गरिबांचे जेवण
कानीकपाळीअरवंड (ओरडणे)
कानाकोपरासर्वत्र, कानाकोचा
काबाडकष्टमेहनत, श्रम
काम काजलहान मोठे काम
काडी-कुटकागवताचा तुकडा, अल्पशी गोष्ट
कामधंदाउद्योग
कामचलाऊतात्पुरता उपयोगी पडणारा
कामचुकारकाम चुकविणारा
कामसाधूस्वार्थी
कायदा कानूनन्याय
कार्यकर्तालोकांची सेवा हौसेने करणारा
कार्यतत्परकार्यात निमग्न
कालवा कालवढवळा ढवळ, घोटाळा
कालत्रयीकधीही नाही
काल पुरूषयम
कावरा बावराभयभीत, गोंधळलेला
काळासावळासावळा
काळ झोपमृत्यूच्या वेळची झोप
काळरात्रभयंकर संकटाची रात्र
काळवेळवेळकाळ, समय
काळ पुरूषयम, त्यासारस्वा क्रूर पुरुष
काही बाहीथोडेसे, भलतेच
किडूक मिडूकबारीक सारीक दागिने
किडा मुंगीजीवजंतू
कुच कामाचाअगदी निरुपयोगी
कुजबुजणेहळूहळू बोलणे
कुरबुरधूसपूस, तंटा
कुल परंपराचाल, रीत
केरकचराकेराप्रमाणे निरुपयोगी पदार्थ
केरकसपटअगदी क्षुल्लक वस्तू
केर पोतेरेझाडलोट, पाणी भरणे इ.
केरवारेकेरकचरा
केरपाणीझाडलोट
कोड कौतुककौतुक, लाड, आवड
कोकण पट्टीकोकण किनारा
कोलवा कोलवचुकवा चुकव, टाळाटाळ
खटाटोपमोठी तयारी, बेत
खबरबातसमाचार, बातमी
खडी साखरखडे जमलेली साखर
खरेदी विक्रीमाल खरेदी करून तो परत विकणे
खडा जंगीजोराचे भांडण, लढाई
खाचखळगेचढउतार, विषमता, खाचखोच
खाणाखुणासंकेत, आठवणीचे चिन्ह
खातर जमाखात्री, विश्वास
खालोखालयोग्यतेने किंचीत कमी
खापरतोडनिपणतूचा/पणतूचा मुलगा (नातवाचा किंवा नातीचा नातू)
ख्याली खुशालीस्वस्थता, गंमत
खाऊन पिऊनतृप्त, खाऊन पिऊन समाधानी
खाणे पिणेअन्न, भोजन, खाद्य पदार्थ इ.
खारीक खोबरेसुका मेवा
खेळी मेळीसलगी
खेळ खंडोबानाश
खोटेनाटेअसत्य
खोगीर भरतीव्यर्थ लोकांची भरती
गप्पागोष्टीरिकामपणाच्या गोष्टी
गगन मंडलआकाशाची पोकळी
गणगोतनातेवाईक, सोयरेधायरे
गल्लीबोळलहान रस्ता
गडबड गोंधळधांदल
गद्धे पंचविशीतारुण्याचा काळ
गरम नरमफार थंड व फार गरम नसलेले
गण मैत्रीजन्म पत्रिकेतील गणांमधील मैत्री
गर्भ श्रीमंतजन्मापासून श्रीमंत
गरीब गुरीबगोरगरीब
गंगा जमुनाअश्रू
गंगा भागीरथीवयस्क विधवा, गंगेचे पवित्र पाणी
गज-घंटाहत्तीच्या गळ्यातील घंटा
गंमत जंमतचैन, मजा
गृहकलहघरगुती तंटा
गाईगुरेगुरे
गाई वासरूगुरे
गाठ भेटभेटी
गाडी-घोडावाहन
ग्राम देवतागावचा प्रमुख कुलदेव
ग्रहगतीग्रहांचा वाईट परिणाम
ग्रामपंचायतगावची व्यवस्था पाहणारी संस्था
गारेगारअतिशय गार
गुरू-दक्षिणाविद्याभ्यास संपल्यावर गुरूस द्यावयाची देणगी
गुरू-संप्रदायगुरुमार्ग, गुरूने घालून दिलेली परंपरा
गुंता गुंतघोटाळा, गोंधळ
गुरे ढोरेगुरे
गुजगोष्टगुपित
गैरवाजवीअयोग्य, अन्याय
गैर फायदाअयोग्य फायदा
गैर समजूतचुकीची समजूत
गैर सोयअडचण, त्रास
गैर मसलतमूर्खपणाचा बेत
गोर गरीबगरीब व दरिद्री
गोरा गोमटासुंदर रूपाचा
गोब्राह्मणगाय आणि ब्राह्मण, गरीब ब्राह्मण
गोरा मोरापांढरा पडलेला
गोरक्षणकसायापासून गाय वाचविणे
गोडी गुलाबीभलेपणा, मैत्री
गोड धोडगोडाचे जेवण
गोपाळकालासर्वांचे जेवण्याचे डबे एकत्र करणे
गोळाबेरीजतात्पर्य, सारांश
गोरापानअतिशय गोरा
गौडबंगाललबाडी, युक्ती, रहस्य
घरदारघर व संसार
घर कोंबडानेहमी घरात राहणारा
घर बारघरदार, प्रपंचाचा पसारा
घायकुतीउतावळेपणा
घाई गर्दीअगदी गडबड, गर्दी
घातपातठार मारणे, नाश
घाई गडबडअगदी गडबड, घाई घाईने
घुसळ खांबदही घुसळण्यासाठी रवी ज्याला बांधतात तो खांब
घेवाण देवणव्यवहार
घोडा गाडीघोड्याची गाडी
घोडा मैदानपरीक्षेची कसोटी
घोडे बैल घोघोडे व बैल
डचूकअक्षम्य चूक
घोडकुदळउपवर झालेली पण लग्न न झालेली मोठी मुलगी
चकडमकडसोंगढोंग, चालढील
चकनाचूरसत्यानाश, नायनाट, चकाचूर, पूड, भुगा
चकमकरयुक्त्या , डावपेच
चक्का चक्कीउघड भांडण, हमरी तुमरी
चक्रपाणीसुदर्शन चक्र धारण करणारा विष्णू
चक्रीपुराणएकाच बैठकीवरून अनेकांनी सांगितलेले पुराण
चट्टामट्टाफडशा, वाऊन संपविणे
चढउतारकमी जास्त
चटणी भाकरीगरीबांचे साधे जेवण
चंद्रप्रभाएक ओषधी गोळी
चंद्रग्रहणचंद्रास लागलेले ग्रहण
चंद्रमणीएक काल्पनिक रत्न
चपलगतीवेग
चरणरजपायधूळ
चरणतळतळपाय
चरणामृतपायांचे तीर्थ
चलनवलनचालणे, वागणे, हालचाल
चलबिचलअस्थिरता
चवढवगोंधळ, भानगड
चवल्यापावल्याकच्चीबच्ची; मोड
चंबूगबाळेभांडीकुंडी, सामानसुमान
चहाफराळचहा व नास्ता
चाटकेबुटकेखेळण्यातील भांडीकुंडी, चुलबोळकी
चांडाळ चौकडीचार वाईट माणसांचा समुदाय
चारा पाणीगुरांचे खाणे
चाल चलनआचार, वर्तन, वागणूक
चांगले चुंगलेचांगलेसे
चिपुटचिंगळीचिटपाखरू
चिरगुट पांघरूणअथरापांघरायचे
चिवून चावूनकाटकसरीने
चिठी (चिठ्ठी) चपाटीलहानसे पत्र
चिरी मिरीलहानशी लाच, बक्षिशी
चिरे बंदीघडीव दगडाचे बांधकाम
चिली पिलीमुले बाळे
चिरकालदीर्घ काळ
चुकूनमाकूननिर्हेतुकपणे
चुरचोंबडावटवट्या
चुडेदानसौभाग्य
चुकला माकलाचुकून राहिलेला
चुनखडाचुन्याचा खडा, निवडक रत्न, चपळ
चूकभूलविस्मरणाने झालेला दोष
चेंगराचेगंरचेपाचेपी
चेंदामेंदाचुराडा, नाश
चेष्टा कुचेष्टाटवाळकी
चेष्टा मस्करीथट्टा
चोरूनमारूनलपूनछपून
चोळामोळाचुरडणे
चोरी चपाटीचोरी, दरोडा
चोर बीरचोर वगैरे, चोरचिलटे
चोरी लबाडीखोटेपणा, कपटीपणा
छान छोकीडामडौल, दिमाख
छिन्न विच्छिन्नछिन्न भिन्न, अस्ताव्यस्त
छेलछबीलीनखरेबाज, देखणा
छोटा मोठालहान मोठा
जमीन जुमलाखेडेगावातील जमीन
जड जवाहीरसोने, रत्ने इ.
जनरूढीलोकांची चाल, रीत
जन्मकुडाळकुचेष्टा करणारा
जपजाप्यधार्मिक कृत्य, जपतप
जंतरमंतरजादूटोणा
जन्म मरणजन्म मृत्यू, जनन मरण
जन्म सावित्रीजन्मसवाशीण
जमीन दोस्तसर्वस्वी नाश झालेला
जयस्तंभस्मारक म्हणून उभारलेला खांब
जलप्रलयसर्व पृथ्वी पाण्यात बुडून जाते तो काळ
जसा तसाजसा येईल तसा, कसाबसा
जय विजयविष्णूचे दोन द्वारपाल
जय पराजयजीत व पराजित, हार जीत
जन जागरणजन जागृती
जगजाहीरप्रसिद्ध
जन प्रवादबाजारगप्पा, जनरीत
जन रीतीलोकांची प्रवृत्ती
जन्मगाठजन्मभर टिकणारा संबंध
जन्मदरिद्रीजन्मापासून दरिद्री
जय गोपाळनमस्काराचा पर्याय शब्द
जल क्रीडाजलविहार
जातपातजातगोत, जात जमात
जाती स्वभावजन्म स्वभाव, जातीनुसार स्वभाव
जाड जुडलढ, धष्टपुष्ट
जाळपोळनासधूस
जाबजबाबबोलण्याचे चातुर्य
जाणता अजाणताकळत नकळत
जातकुळीजात, वंशासंबंधी माहिती
जिरवाजिरवनिरवा निरव, छपवा छपवी
जीवश्च कंठश्चजीवलग
जीव जंतुलहान किडा
जुलूम जबरीबलात्कार, जुलूम
जुना पुराणाफार दिवस वापरलेली वस्तू, जुनवट, जीर्ण
झगडा बिगड़ावादविवाद, भांडण, तंटा
झाडे झुडपेझाडांचा समुदाय (झाड झाडोरा)
झाड लोटझाडून साफ करणे
झाड पालाऔषधाच्या उपयोगी पाला, वनस्पती
झाकपाकजेवणानंतरची उरली सुरली कामे
झुंजुक मुंजुकपहाटेचा संधी प्रकाश, झुंजुमुंजू
झोंबा झोंबीओढाओढ, हिसकणी
टंगळ मंगळटाळाटाळ, चुकवा चुकव, बेपर्वाई
टकामकानिश्चलपणे, चकित होऊन
टकेटोणपेअडथळे, संकटे
टाणा टोणाजादुगिरी, मंत्रतंत्र
टापटेपउंचवटे, टेकाडे
टापटीपसुव्यवस्था
टापस टीपपुरेपूर, प्रसंगानुरूप
टाळाटाळभूलथाप, चालढकल
टोले जंगमजबूत, बळकट
टोळभैरवउडाणटप्पू, रिकामटेकडा
ठाकठीकसुव्यवस्था, नीटनेटका, ठीकठाक
ठाकून ठोकूनप्रसंगानुरूप
ठाला ठेलभरगच्च, खच्चून भरलेले
ठाव ठिकाणापत्ता, मागमूस
ठायी ठायीठिकठिकाणी
ठेवरेवभांडवल, संचय
ठोकतापीरभांडखोर
डरांव डरांवबेडकाचे ओरडणे
डगमगलटपट, डळमळीतपणा, अस्थिरता
डचमळणेरखळबळणे, वर उसळणे
डबडबणेअश्रृंनी भरून येणे
डायाडोलभयभीत
डावपेचखेळातील रखुबीदार डाव
डावाउजवाव्यवहारोपयोगी चातुर्य
डाळ भातसाधे जेवण
डागडुगीलहानसहान दरुस्ती
डाम डौलडौलदार, छानछोकी, थाटमाट
डोळे मोडनेत्र संकेत
डोंगर दरीडोंगर व दरी असलेला भाग
डोंगर पठारसपाट प्रदेश
ढकला ढकलीविनाकारण वेळ घालविणे
ढवळा ढवळउलाढाल, गोंधळ
ढवळा पवळाबैलांची जोडी
ढाल ढकलचालढकल, दिरंगाई
ढाल-तलवारलढाईची (मारामारीची) साधने
तन मन धनसर्वस्व, शरीर मन व संपत्ती
तप्तमुद्रादीक्षा घेताना तांब्या पितळेच्या मुद्रा तापवून अंगावर चिन्हे उमटवितात
तर्क ज्ञानअनुमान करण्याची शक्ती
तर्क कौशल्यकल्पना करण्याचे चातुर्य
तडका फडकीझटापट, तात्काळ, तरकाफरकी
तडफडाटचडफडाट
तरवार बहादुरशूर, रणगाजी (तलवार - तरवार)
तडजोडसलोखा, समेट
तप्तशुलतापविलेला सूळ
तर्क वितर्ककल्पना, अनुमान, अंदाज
तर्क विद्यावादविवादपटुता, अंदाज करण्याची कुशलता
तंटा बखेडाबोलाचाली, भांडण
ताट वाटीजेवणाची तयारी
ताकडा तुकडालहान मोठा तुकडा
तारंतारतंतोतंत, बरोबर
तारतम्यश्रेष्ठ कनिष्ठ भाव, बरेवाईटपणा
ताळमेळदेश काल इ. चा मेळ
तान मानयोग्य व अनुकूल परिस्थिती
तांब्या पेलापाणी पिण्यास लागणारी भांडी प्र
ताजा तवानाफुल्ल, टवटवीत
तिखट मीठमीठ मसाला
तिरसटचिडखोर
त्रिमूर्तीब्रह्मा, विष्णु, शंकर या तिघांचा मिळून झालेली मूर्ती
त्रिभुवनस्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक
त्रिवर्गतिघेजण, उत्कर्ष, साम्य, हास ह्या तीन अवस्था, तीन पुरुषार्थ
तेल फणीकेस नीट करणे, केस विंचरणे
तेजःपुंजतेजस्वी
तेरी मेरीहमरी तुमरी, अरेतुरेवर आलेले भांडण
तैल चित्रतेलाच्या रंगांनी काढलेले चित्र
तोळामासाथोड्या प्रमाणात
तोडमोडकिडुकमिडुक, मोडकी-तोडकी
त्रेधा तिरपीटओढाताण, तारांबळ
थंतर मंतरजादूटोणा, मंत्रतंत्र
थकला भागलादमलेला
थय थयआनंद, मौज किंवा राग व्यक्त करण्यासाठी नाचणे
थांग पत्तासुगावा, ठाव
थातूर मातुरअर्थहीन, निरर्थक
थाटमाटडौल, डामडौल
थोडा थोडकाअल्प प्रमाणात
दगडधोंडादगड
दगाबाजीकपट, ठकबाजी
दगेबाजअप्रामाणिक
दगा फटकाकपट, लबाडी
दम छाटश्वासोच्छ्वास निरोधनाची शक्ती
दमदाटीधाकदपटशा
दळण कांडणमोलकरणीची घरातील ढोबळ कामे
दहीभातदह्यात कालविलेला भात
दंगामस्तीगडबड, गोंधळ
दडप शाहीअरेरावी, जुलमी अंमल
दरी दरडीउंच सखल
दस्तऐवजहक्क पत्र, प्रमाण पत्र
द-याखो-यामोठा विस्तार
दर्या सारंगनावाडी, खलाशांचा नायक
दस्तस्वतसही
दळण वळणपरिचय, व्यवहार
दृष्टादृष्टनजरानजर, परस्पर दर्शन
दंत कथालोककथा, शास्त्रप्रमाणविरहित
दाणा पाणीगोष्ट निर्वाह, पोट भरणे
दाणा गोटाधान्यधुन्य, डाळी
दाणादाणसैरावैरा पळणे, पांगापांग
दान धर्मपरोपकाराची धार्मिक कृत्ये
दानशूरदानवीर, दान देण्यात शूर
दावेखोरीशत्रुत्व, वैर
दान धर्मपुण्यासाठी कलेले दान
दाग दागिनेअलंकार
दान पात्रदान देण्यास योग्य
दातकडीदातखिळी
दिवाबत्तीदिवे
दिलदारीउदारता
दिलहवालअस्वस्थ
दिवसा ढवळ्याभरदिवसा
दिवाळी दसरासणाचा दिवस
दीन दुःखीदीन दुबळे, केविलवाणा, अनुकंपनीय
दिवस रात्रसतत
दुजाभावमनाचा दुटप्पीपणा, आत एक बाहेर एक अशी वृत्ती
दूध दुभतेदूध, दुभते पदार्थ
दूरदृष्टीकुशाग्र बुद्धी
दुराचरणनिंद्य, वाईट वागणूक
दूध भातदूध आणि भात, मेजवानीच पण विनयाने उल्लेख करण्याचा शब्द
देवाण घेवाणदेवघेव, व्यवहार
देवधर्मधार्मिक कार्य, नवस करणे, देवपूजा
देवदानवसुरासुर
देव देवतादेवता, परमेश्वर
देव दर्शनदेवाचे दर्शन
देव ऋषीदेवर्षी, नारद
दैवगतीनशीब
धकाबुकीधक्का बुक्की, धक्के व बुक्के यांचा मार
धडधाकटशाबूत, अव्यंग
धनदौलतसंपत्ती, मालमत्ता
धरपकडगुन्हेगार, चोर यांना पकडण्याची क्रिया
धरसोडचंचलता, अस्थिर
धष्टपुष्टगुबगुबीत, निकोप, धट्टाकट्टा
धरतीमाताभूमाता, जमीन
धनुष्य बाणऐतिहासिक काळातील लढाईचे साधन
धर्मकर्मआचार, वर्तन
धर्मयुद्धन्याय युद्ध, निष्कपट युद्ध
धनधान्यसंपत्ती, घरदार, मालमत्ता इ.
धागादोरासंबंध, पत्ता
धावाधावपळापळ, घाईने इकडे तिकडे पळणे
धान्य धुन्यभात, गहू, ज्वारी इ. धान्य
ध्यानीमनीअंतःकरणातील सर्व अवस्था व्यापणे
धावत पळतअतिशय वेगाने, लवकर
धांगड धिंगागोंधळ, दांडगाई
धुमधडाकागोंगाट, दणदणाट
धुमाकूळगोंधळ, दंगामस्ती
धेडगुजरीअनेक भाषांची खिचडी
धोपट मार्गसरळमार्ग, परंपरागत चालत आलेली रीत, पद्धत
धोतर जोडीदोन धोतरांची एक जोडी
नखशिखातआपादमस्तक, सर्व शरीरभर, पायाच्या नवापासून शेंडीच्या अग्रापर्यंत
नंगानाचनिर्लज्जपणाचे वर्तन
नजर बंदीजादुगिरी, हातचलाखी
नटूत थटूतसजून, नट्टापट्टा करून
नंदीबैलसंकेताप्रमाणे वागणारा
नन्नाचा पाढाप्रत्येक गोष्टीला नकार देणे
नरकुंजरगणपती, नरश्रेष्ठ
नफातोटाफायदा व नुकसान
नदी नालेलहान मोठे पाण्याचे प्रवाह
नगरवासीशहरात राहणारे
नकार घंटानाकबूल करणे
नटवा नटवीनखरेबाज
नवरा बायकोदंपती, पती पत्नी
नवनवतीतारुण्याची आरंभदशा
नवरा नवरीनवदंपती, वर आणि वधू
नगार खानावाद्यांचा कारखाना, देऊळ
नव वधूनवी नवरी
नव भूमीनवीन भूमी, नवीन ठिकाण
नाव लौकिकप्रसिद्धी, कीर्ती
नाक कानअवयव
नामो निशानअस्तित्व, नावकुल, संबंध
नाच गाणेनाचगाण्याचा कार्यक्रम
न्याय नीतीन्याय निवाडा, न्याय, खरेपणा
नावगावनाव निशाण, संबंध, नावकुल
निमक हरामकृतघ्न, बेईमान
निमक हलालकृतज्ञ, विश्वासू
निशाणबाजीनेम मारणे, वेध
निवासस्थानघर
निम्माशिम्माअर्धेमुर्धे
निसर्ग रम्यनिसर्ग सौंदर्य, स्वाभाविक सौंदर्य
निसर्ग प्रेमनिसर्गावरील प्रेम
निज मुखस्वतःचे तोंड
निळे काळेनिळा व काळा रंग मिळून झालेला हिरवा रंग, निस्तेज
निळा शारनिळे शहर (शार-शहर)
निळा सावळासावळा
नेत्रपल्लवीनेत्र संकेत, खुणेची भाषा
नोकर चाकरसेवक, चाकर, दास
नोक झोकनखरा, थाटमाट
पडझडमोडतोड
पही पाहुणावाटसरू, अतिथी, पै पाहुणा
पक्षपातकैवार
पशुपक्षीप्राणीमात्र
पळवा पळवीपळापळ, धावाधाव
पहिला वहिलाप्रथमचा
पदोपदीपावलो पावली, क्षणोक्षणी, वारंवार
पदर मोडस्वतः खर्च करून
पंचयज्ञपांच प्रकारचे यज्ञ, ब्राह्मणाने करावयाचे यज्ञ
पाऊल वाटअरूंद वाट, पायवाट
पालापाचोळाकचरा, निरर्थक वस्तू
पाटपाणीजेवणाची तयारी
पांढरपेशाउच्च वर्णीय
पाताळयंत्रीगूढ, कारस्थानी
पानसुपारीविड्याचे साहित्य, पोस्त, लांच
पायपोसचप्पल, पादत्राण
पायगुणशुभाशुभ शकुन
पांढच्या पायाचाअपशकुनी, वाईट पायगुणाचा
पांढराफटकनिस्तेज
पालनपोषणसंरक्षण, सांभाळ
पावलोपावलीवेळोवेळी, पदोपदी
पाच पन्नासथोडेसे
पाने फुलेदेवाच्या पुजेसाठी फुले व पाने
पाऊस पाणीपाऊस, पीक इ. पर्जन्यमान
पांढरा शुभ्रअतिशय पांढरा
पालुपदवारंवार म्हणणे, ध्रुपद
पाहुणा राउळापै पाहुणा, पाहुणा बिहुणा, पाहुणा
पाठोपाठपाठीमागून, मागोमाग, लागोपाठ
पास नापासनिकाल
पाने बिनेपाने इ.
पांढरा कावळाअप्राप्य वस्तु
पायपीटविना कारण चालण्याचे श्रम
पिवळा जर्दपिवळाधमक, अतिशय पिवळा
पिढ्यानपिढ्यावंशपरंपरागत
पीक पाणीपीक
पुसतपासखोल चौकशी
पेच प्रसंगविपत्ती
पैसा अडकापैसे, पै पैसा
पोरे बाळेमुले
प्रसंगावधानसंकट समयी भांबावून न जाणे
फट फजितीफजिती, अपमानकारक स्थिती
फसवा फसवीफसवणूक
फंद फितुरीदगलबाजी, कारस्थान
फाटका तुटकामोडका तोडका
फाकड पसाराफापटपसारा, अवास्तव मांडलेला
फाटाफूटपसारा वेगळे होणे, ताटातूट, विभक्त
फिरवा फिरवउलटसुलट, उलथविणे, खालीवर करणे
फुकट फाकटफुकट, मोफत
फेर फटकाइकडे तिकडे फिरणे, भटकणे
फेका फेकभिरकाविणे
फौज फाटासैन्य व त्या बरोबर असणारे लोक, साहित्य इ. फौज, सैन्य
बकध्यानसाधुत्वाचे ढोंग
बरे वाईटमरण, नाश
बहिणभावंडेभावंडे, बहीण भाऊ, जवळचे नातेवाईक
ब्रह्मघोटाळागोंधळ, आचारविचारांची अव्यवस्था
बनवा बनवीएकमेकांना बनविणे
बाजारहाटबाजार खरेदी, बाजारपेठ
बापलेकवडील व मुलगा किंवा मुलगी
बाग बगीचाफुलबाग, मळा
बागुलबोवाभीती वाटण्यासाठी उभे केलेले सोंग
बाजार बुणगेफौजे बरोबर असणारी अवांतर माणसे
बाड बिछानाबाड बिस्तरा, सामानसुमान
बाप जन्मीसर्व आयुष्यात, जन्मापासून आजपर्यंत
बाल्यावस्थाबालपण
बाळी बुगडीबारीकसारीक दागिने
बारीकसारीककिरकोळ, बारीक
बाळगोपाळलहान मुले
बाळकडूबाळघुटी, कडू औषधे उगाळून पाजतात ते
बालबोधसुलभ, सुबोध, लहान मुलांना समजेल असे
बाया बापड्याबिचार्‍या बायकांचा
बित्तबातमीनक्की बातमी, बित्तं बातमी
बिनधोकनिश्चित
बिनडोकविचार न करणारा, मूर्ख
बिनतोडबिनचूक, सर्वोत्कृष्ट
बीजारोपणबी पेरणे
बुद्धी पुरःसरमुद्दाम, जाणून बुजून
बेभरवशीफसव्या
बेल भंडारएक प्रकारचा शपथ विधी
बेरीज वजाबाकीहिशेब
बैल गाडीबैल जोडलेली गाडी
बोलघेवडावाचाळ, वटवट करणारा
बोलाचालीसंभाषण
भरत भेटराम व भरत यांची भेट
भक्त वत्सलभक्तावर अती प्रेम करणारा
भरमसाटपुष्कळ, अमर्याद
भक्तीभावभक्तीयुक्त प्रीती, पूज्यतेचा भाव
भले मोठेखूप मोठे
भलतासलताकोणीतरी, कोणतातरी
भात भाकरीजेवण, (भाजी, भाकरी, पोळी इ.)
भाऊ बंदकीबंधुत्वाची वागणूक
भाकड कथाबाष्कळ गप्पा, कंटाळवाणी गोष्ट
भांडी कुंडीसर्व प्रकारची भांडी
भाजी पालाफळ भाजी व पाले भाजी, कंदमुळे इ.
भाकर तुकडाभूक भागविण्यासाठी थोडेसे खाणे
भाऊ भाऊभावंडे
भांडण तंटाभांडण, कलह
भीड भाडसंकोच, पर्वा, मुर्वत
भुई सपाटभुईस लागून, भुपृष्ठ
भूत पिशाचभुते खेते, मृतांची छाया
भेदाभेदभेदभाव, परकेपणाची भावना, फरक
भोळाभाबडासाधा भोळा, भोळासांब
भोसका भोसकीमारामारी
मनकवडादुस-यांचे मन वेधून घेण्याची शक्ती असलेला
मंत्र तंत्रजादूटोणे, डावपेच
मराठ मोळामराठी लोकातील चालीरीती
मरतुकडाअतिशय अशक्त मनुष्य, रोडका
मनमुरादआनंददायक, मनसोक्त
मनमिळाऊसर्वांशी मिळून मिसळून वागणारा
मनःकामनाअंतःकरणातील इच्छा
मनमोकळारखुल्या अंतःकरणाने, संकोच सोडून
मर्कट चेष्टामाकड चेष्टा, पोरकट चाळे
मागमूसपत्ता, चाहूल
मान मरातबआदर सत्कार, बहुमान
म्हातारा कोताराम्हातारा, वृद्ध, वयस्क
मातापितरआईवडील, मातापिता
मारपीटखूप मारणे, मारहाण
मामा भाचेनातेवाईक, मामा व भाचा
माया ममतादया, माया, स्नेह, प्रीती
मायलेकीआई व मुलगी, माय लेकरे, माय माऊली
मागे पुढेआगे मागे, केव्हा ना केव्हा
मान अपमानआदर-अनादर
माल मसालासामग्री, उपयुक्त वस्तू
मान पानआदर सत्कार, मान सन्मान
मीठ भाकरजेवण, गरिबीचे जेवण
मीठ मिरचीमसाला, चव आणणारे पदार्थ
मुले बाळेलहान थोर सर्व मुले
मूठमातीपुरण्याचा अंत्यसंस्कार
मेटाकुटीमहत्प्रयास
मेवा मिठाईअनेक प्रकारची फळे व मिठाई
मैलोमैलखूप दूरपर्यंत
मोडतोडनासधूस
मोडका तोडकामोडकळीस आलेला
मोल मजूरीमजुरी घेऊन केलेली लोकांची कामे
यथाशक्तीआपल्या शक्तीप्रमाणे
यथायोग्ययोग्य दिसेल तसे, अनुरूप, रूढीनुसार
यथाविधीनियमानुसार
यथासांगपूर्णपणे, कोणती ही गोष्ट कमी न करता
यथातथाकसा तरी, कष्टाने, जेमतेम
यश अपयशमानापमान, स्तुती किंवा निंदा
याता यातहेलपाटा, त्रास, कष्ट
येर जारयेरझार, खेपा, हेलपाटा
रक्त बंबाळरक्ताने माखलेला
रंगढंगएकंदर देखावा, युक्ती, चाळा
रंग रंगोटीघर किंवा चेहरा रंगविणे
रत्न जडितरत्ने बसविलेला
रमत गमतघाई न करता, विनत्रासाने, सहज
रहाट गाडगेचांगली व वाईट परिस्थिती, नशीबाचे फेरफार, व्यवहार
रत्ने माणकेमूल्यवान खनिज पदार्थ
रंगबहारआनंदाची लूट, मौज, सुख
रडत राऊतरडवा मनुष्य, रडतराव
रडत खडतमोठ्या कष्टाने, रेंगाळत, नाइलाजाने
रंजलेले गांजलेलेपीडीत, दुःखित
रंगभंगविरस, आनंदाचा नाश
रदबदलमध्यस्थी, वाटाघाट
रानी वनीजंगलात
रान फुलेजंगली फुले
राजा राणीराजा व राणी, विनोदी जोडपे
राजे महाराजेसम्राट, राजे व महाराजे
राग लोभदुःख व आनंद
राम राज्यन्यायाचे व प्रजेचे रक्षण करणारे राज्य
राष्ट्रद्रोहराष्ट्राशी शत्रुत्व
रान पाखरेरानातील पाखरे
राम रगाडागर्दी, पराकाष्ठेची दाटी
राजे रजवाडेराजे, संस्थानिक, सरदार इ.
राख रांगोळीनाश, विध्वंस
राग रंगरागाची लक्षणे
रिकाम टेकटानिरूद्योगी
रीतभातरीतीरिवाज
रूपलावण्यसौंदर्य, बांधेसूदपणा
रूसवा फुगवाहट्ट, राग आणि चरफड
रोखठोकउधारीचा नसलेला (रोख), स्पष्ट
रोगराईलहानमोठे रोग
लघाळ मावशीगप्पा मारणारी बाई
लपत छपतचोरून, गुप्तपणे
लहान सहानबारीक सारीक, हलका
लक्षावधीलाखो
लग्नकार्यलग्न समारंभ, मंगल कार्य
लता वेलीवेली
लघळ पघळअतिशय बडबड
लंबा-चौडा (चवडा)लांबलचक
लग्न-बिग्नलग्न आदि समारंभ
लहान थोरलहान आणि मोठा
लाकूड फाटाघर बांधण्यासाठी लागणारे लाकूड विटा इ.
लाजकोंबडालाजाळू, भिडस्त
लाजलज्जालाज, मर्यादा
लांडा कारभारनसती लुडबुड, उठाठेव
लांब लचकप्रशस्त, अवाढव्य
लांडी लबाडीलहान मोठी लबाडी, फसवणूक
लालन पालनसांभाळ, संगोपन
लाडी गोडीलाडकेपणा
लाच लुचपतलाच, अप्रामाणिकपणाची देवाण घेवाण
लाल भडकअतिशय तांबडा
लागे बांधेनातीगोती
लांब सडकलांब रस्ता
लांडगे-कोल्हेहिंस्त्र पशु
लुगा सुंगाबारीक, क्षुद्र, नालायक
लुळापांगळाकमजोर, व्यंग असलेला
लेचापेचाअशक्त, कमजोर
लेकरे बाळेमुले बाळे
लोक-परलोकइहलोक व परलोक लो
लोट पोटळण, बेसुमार, मौज, आनंद
लोणकढी (थाप)समयानुसार ठेवून दिलेली (थाप), खोटी बातमी
लोणकढे (तूप)ताजे साजूक (तूप)
वज्रघातमोठी आपत्ती
वजन मापप्रमाण
वरण भातसाधे जेवण
वर्ण धर्मव्यवहार, जातीला योग्य असा आचार
व्रत वैकल्यव्रताची अपूर्णता, नेम, व्रते
वर रवालउंचसखल, विषम रीतीने
वर्णहीनजातीहीन
वर्ण क्रमअक्षरांचा क्रम
वृक्षवाटिकाबाग, उपवन
व्यथा वेदनादुःख, वेदना
वटहुकुमताबडतोब अमलात येणा-या कायद्याचे फर्मान
वडील धाराघराण्यात शिस्त राखण्याचा अधिकार असलेली व्यक्ती
वरचष्मावरचढपणा, वर्चस्व
वरदहस्तमोठ्यांचा आशीर्वाद, वर देण्यासाठी उचललेला हात
वरदक्षिणावधूचा पिता वरास देतो ती रक्कम
वहिवाटचाल, रीत, व्यवस्था
वाडवडीलपूर्वज, वडील माणसे
वास्तपूस्तविचारपूस
वाईटसाईटनिरुपयोगी, निरर्थक
व्यापार उदीमव्यवहार, कामधंदा
वादळ वारेतुफान
वाकडा तिकडावक्र
वाटा घाटीचर्चा, वादविवाद, वाटाघाट
वाक् बगारकुशल, पटाईत
वाचाळ पंचविशी बडबड लावणे
वाणसौदावाणसवदा, किराणा माल
वाजत गाजतधुम धडाक्यात
वाजागाजाप्रसिद्धी, गवगवा
वाटचालप्रवास
वादविवादचर्चा
वारे मापप्रमाणाबाहेर, विसंगत
विघ्नसंतोषीदुस-यांच्या कामात विघ्न आलेले पाहून संतोष मानणारा
विचारपूसवास्तपुस्त, चौकशी
विधिघटनानशीब, प्रारब्ध, कर्मगती
वितंडवादअट्टाहासाने खोटा पक्ष स्थापन करण्यासाठी वादविवाद
विनासायासश्रमाशिवाय
विरहव्यथाविरहामुळे, होणारे दुःख
विल्हेवाटउधळपट्टी, व्यवस्था, योग्य योजना
विश्वासघातविश्वास दाखवून फसवणूक, बेइमानी
विस्मय चकितआश्चर्यचकित
वेडा वाकडावाकडातिकडा
व्यासपीठउच्चासन, पुराणिकांचे आसन
शत पावलीजेवाणानंतरच्या फे-या
शरीर प्रकृतीशरीराची ठेवण, स्वभाव
शंखशिंपलेसमुद्रात राहणा-या काही प्राण्यांची घरे
शतमूर्खअत्यंत मूर्ख
शहाणा सुरताबुद्धीमान, हुषार व देखणा
शरीर यष्टीशरीर ठेवण, अंगकाठी
शब्द पाल्हाळशब्दावडंबर, शब्दजाल
शर पंजरबाणांचा पिंजरा, पलंग
श्रम जीवीमेहनती
श्रमदानसमाजासाठी विनामूल्य कष्टाचे काम करणे
शिळापाकाउरलेसुरलेले जेवण
शिकला सवरलेलाशिक्षण घेतलेला, शिक्षित
शिवण टिपणशिवणकाम
शिरोमणीमुकुटमणी, श्रेष्ठ इसम
शिपाईप्यादेजासूद, सैनिक
शीघ्रकोपीरागीट, तापट
शेजारपाजारशेजार
शेठसावकारसावकार, व्यापारी
शेंडेफळअखेरचे मूल
शेती भातीशेतीवाडी, शेती, शेत जमीन
शेला पागोटेबहुमानाची वस्त्रे
शेणसडापाण्यात शेण घालून जमिनीवर शिंपडणे
शेळ्या मेंढ्यापाळीव जनावरे, बुधिबळातील एक डाव
शे दोनशेशंभर-दोनशे
षोडशोपचारविधीपूर्वक केलेले काम, पूजेचा विधी
सकट निकटएकूण सगळे
संगतीसोबतीस्नेही, दोस्त, संगतसोबत
सगा सोयरानातेवाईक, सगेसोबती, सगे संबंधी, सोयरा धायरा
सडपाताळकिरकोळ अंगाचा, रोडका
सणवारसणबीण
सदलाबदलअदलाबदल
समज उमजपूर्ण जाणीव, ज्ञान
सर मिसळमिश्रण, एकत्रीकरण
स्वयंपाक पाणीजेवण
सटरफटरकिरकोळ
सदा सर्वदानेहमी, सतत
सरळसोटसरळ
सणसुदीसणाचा दिवस
सडा सारवणझाडलोट
समुद्रमंथनसमुद्र घुसळणे
वादविवादवाटाघाट
सल्यापसल्यचांगले वाईट
समुद्रमेस्वलापृथ्वी
सवतासुभास्वतःचे असे निराळे
सती सावित्रीपतिव्रता, साध्वी
सटी सामासीक्वचित प्रसंगी, कधीतरी
सत्ययुगचार युगातील पहिले युग, सुवर्णयुग
सत्वनिष्ठसत्व न सोडणारा
सल्लामसलतविचार विनिमय, हितवाद
सरसकटसरासरी, एकत्रितपणे
सत्य-असत्यखरेखोटे
सर्वसामान्यसर्वास लागू होणारा
सावरभातसाखर व केशर घालून केलेला भात
साद पडसादप्रतिध्वनी
साधाभोळासरळ, स्वभावाने गरीब
सागरतीरसमुद्रतीर, समुद्र किनारा
सांड लवंडसांडासांड, सोडणे, पालथे करणे
साडी चोळीस्त्रियांचा पोषाख
साज-शृंगरथाटमाट, सजणे, नटणे
साखर झोपअरुणोदयाच्या वेळची झोप
साधा सिधासरळ, एकमार्गी, निष्कपट
सांज सकाळनेहमी
सामान सुमानचीज वस्तू, सामग्री, साहित्य
स्नान संध्यास्नान व संध्या, देवपूजा
सांग सुगरणनुसती तोंड पाटील की करणारी
सांगा वांगी, सांगोवांगीऐकीव गोष्ट
साधक बाधकअनुकूल व प्रतिकूल, योग्य अयोग्य
सासुरवाडीपत्नीचे माहेर
साळीमाळीसमाजातील काही वर्ग
साफसफाईस्वच्छता, साफसुफी
साधुसंतसाधू आणि संत
स्त्री-पुरुषपतीपत्नी, पुरुष व स्त्रिया
सुख-सोहळाआनंददायक प्रसंग
सुईदोरासुई आणि दोरा
सुकाळसौदाअत्यंक स्वस्त मालाची देवघेव
सुरंगाठसहज सुटण्यासारखी गाठ
सुतरामजरासुद्धा (नाही)
सुदामपोहेगरीब माणसाची भेट
सुतोवाचसुचविणे, सांगण्यास किंवा बोलण्यास सुरवात करणे
सेवासुश्रूषाआजारी माणसाची काळजी घेणे
सोनेनाणेसोने व इतर किमती वस्तू
सोक्षमोक्षगुंतून पडलेल्या व्यवहाराचा काही तरी कायमचाशेवट करणे, मोकळीक
सोयरे सूतकलागे बांधे
सोवळे ओवळेशुद्धतेने राहण्यासाठी सोवळेपणाची स्थिती
हरीवदनहरीचे नामस्मरण
हरिचंदनकेशर, पिवळा चंदन
हसवाहसवीहास्य
हलकी सलकीकमी दज्र्याची, कमी प्रतीची
हवा पाणीवातावरण
हळदीकुंकूसौभाग्यदर्शक, हळद कुंकू
हसतखेळतमजेत, हासत बागडत
हरि पाठविठ्ठल भक्तीपर अभंग
हवा पालटहवेत बदल
हमरीतुमरीहंबरातुंबरी, जोराचे भांडण, हमरातुमरी
हकनाकहकनाहक, विनाकारण
हर हुन्नरप्रत्येक कौशल्य, कसब
हाड वैरअत्यंत तीव्र व फार जुने वैर
हात घाईअती घाई
हातचलाखीहस्त चापल्य, नजरबंदीचा कारभार
हातानिराळाहातावेगळे, घेतलेले काम संपविणे
हाल अपेष्टानाना प्रकारची संकटे, आपत्ती
हाव भावभावनादर्शक अभिनय
हृदय शून्यनिर्दय, क्रूर
हाल हवालहकीकत, वर्तमान, हालअपेष्टा
हाडी मासीशरीराने, अंगकाठी, शरीर रचना
हास्य विनोदथट्टा मस्करी
हिरवा-निळारंगाची छटा
हिरवा गारगडद हिरवा
हिरवा पिवळारंगाची छटा
हेकेखोरहट्टी, दुराग्रही
हेवेस्वोरव्देशी, मत्सरी
हेवादावा(हेवादेवा)शत्रुभाव, व्देश, मत्सर
हैबती गैबतीअजागळ
हैदोसदुल्ला हैदोस, गोंधळ
होमहवतहोम, यज्ञ
हौसमौजचैन, इच्छा
क्षमा याचनाक्षमेची भिक्षा मागणे
क्षणोक्षणीपावलो पावली, प्रत्येक क्षणास
क्षीरसागरदुधाचा समुद्र
क्षेम कुशलकुशल क्षेम समाचार
ज्ञान विज्ञानशास्त्रीय ज्ञान
ज्ञानदीपबुद्धीरूपी दिवा
ज्ञान कोशज्ञानाचा कोश (संग्रह)
ज्ञान अज्ञानज्ञान आणि अज्ञान
ज्ञान साधनाज्ञान संपादन करणे
ज्ञान सागरज्ञान रूपी सागर
ज्ञान मंदिरशाळा, ज्ञान प्राप्त होण्याचे ठिकाण


Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार