Posts

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द अ अरण्याचा राजा वनराज अरण्याची शोभा वनश्री अपेक्षा नसताना अनपेक्षित अस्वलाचा वेळ करणारा दरवेशी अंग राखून काम करणारा अंगचोर अनुभव नसलेला अननुभवी अन्न देणारा अन्नदाता अग्नीची पूजा करणारा अग्नीपूजक अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष पुरविणारा अष्टावधानी अचुक गुणकारी असे रामबाण अंतःकरणाला पाझर फोडणारे ह्रदयद्रावक अग्नी विझवल्यानंतर राहणारी पांढरी भुकटी राख अगदी न बोलणारा मुखस्तंभ अन्नाची भिक्षा मागणारा माधुकरी अतिशय सुंदर पुरुष मदनाचा पुतळा अतिशय मोठे प्रयत्न भगीरथ प्रयत्न अधाशीपणे तोंड भरून घेतलेला घास बोकना ,  बोकणा अतिशय वृद्ध झालेला माणूस पिकले पान अत्यंत रोड अशी व्यक्ती पाप्याचा पितर अत्यंत खोल (गूढ) मसलत करणारा पाताळयंत्री अतिशय दुर्मिळ असा आलेला अनुकूल योग पर्वणी अक्षर ओळख नसलेला निरक्षर अनेक पदार्थांच्या समुदायात जे उत्तम असेल ते नगदमाल अतिशय उग्र स्वरूप धारण करणारा नृसिंहावतार अर्थ न समजता केलेले पाठांवर पोपटपंची अगदी दुर्मिळ झालेली वस्तू किंवा व्यक्ती ..... उंबराचे फूल अतिशय लवकर रागावणारा शीघ्रकोपी अंधाच्या रात्रीचा पंधरवडा क...

कल्पनाविस्तार

कल्पनाविस्तार आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी भाषा ही फार महत्त्वाची भूमिका साकारत असते. प्रत्येकाला व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी भाषेची मदत घ्यावी लागते. जेवढे भाषिक ज्ञान अधिक तेवढीच आपली आकलन शक्तीही सुधारण्यास संधी मिळते. भाषेचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे असते. उत्तम लेखन ही एक कला आहे. ती कला ज्याला साध्य होते तो प्रतिभावान लेखक ठरतो. सर्जनशील लेखनामध्ये परिच्छेदलेखन, सारांशलेखन, दैनंदिनीलेखन, कथालेखन, पत्रलेखन, निबंधलेखन, कल्पनाविस्तार आदी लेखनप्रकारांचा समावेश होतो. आपण येथे कल्पनाविस्तार हा लेखनप्रकार अभ्यासणार आहोत. कल्पनाविस्तार : कल्पनाविस्तार म्हणजे एखाद्या ओळीतील कल्पनेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करणे. शब्दशः अर्थाबरोबरच त्या ओळीतून सूचित होणारा गर्भितार्थ, लक्ष्यार्थ समजून घेऊन त्या वेगवेगळ्या अर्थछटांचे स्पष्टीकरण करावे लागते. विविध दाखले, उदाहरणे देऊन लालित्यपूर्ण लेखन करून त्या कल्पनेतील विविध अर्थ वाचकापर्यंत पोहोचवणे म्हणजे कल्पनाविस्तार. सुवचन, सुभाषित, काव्यपंक्ती, म्हण यांचा कल्पनाविस्तार केला ज...

वृत्तांत लेखन

वृत्तान्तलेखन  एखाद्या घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन करणे म्हणजे वृत्तान्तलेखन होय. सभा, संमेलने, शिबिरे, परिषदा, कार्यशाळा, समारंभ यांच्याविषयी किंवा त्या त्या परिसरामध्ये एखादी घटना घडल्यावर त्या घटनेसंबंधी सविस्तर व क्रमवार माहिती सांगणे म्हणजे वृत्तान्तलेखन होय. वृत्तान्तलेखनात कल्पनेला फारसा वाव नसतो. कारण घडलेल्या घटनेचे जसेच्या तसे वर्णन वृत्तान्तात करावे लागते. सत्यकथन आणि वस्तुनिष्ठता यांना अधिक महत्त्व द्यावे लागते. घटना किंवा प्रसंग याबाबतीत माहिती देताना तारीख, वेळ ठिकाण देणे आवश्यक असते. वृत्तान्तलेखन आटोपशीर आणि आकर्षक पद्धतीने करणे ही एक कला आहे. वर्तमानकाळात घडलेल्या घटनांची सविस्तर आणि वस्तुनिष्ठ माहिती वृत्तान्तलेखनातून जनतेला देण्याची लेखकाची जबाबदारी असते. त्यामुळे वृत्तान्तलेखनात राग, आनंद, दुःख, आश्चर्य अशा तीव्र भावना करू नयेत. अर्थात घटनेचे वर्णन करताना नावीन्य व ताजेपणा असला पाहिजे. घटनेचा वृत्तान्त वाचणारे वाचक समाजातील विविध स्तरांतील असतात. त्यामुळे वृत्तान्तलेखनात समाजाची गरज आणि समाजाची ग्रहणशक्ती या बाबींचा विचार करावा लागतो. मुद्दे : १. व...

गद्य आकलन

गद्यआकलन दिलेला गद्य उतारा वाचून त्यातील मुख्य व महत्त्वाचा विचार किंवा विषय समजून घेणे म्हणजे उताऱ्याचे आकलन होय.    एखाद्या पुस्तकातील उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्याचे आकलन झाले की त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचावा. त्यातील माहिती बारकाईने समजून घ्यावी. उताऱ्यात कोणते तत्त्व किंवा विचार पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जाणून घ्यावे.   दिलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांची उत्तरे उताऱ्यातून शोधून काढून स्वतःच्या शब्दांत लिहावीत. ती उत्तरे लिहिताना उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी उतरवून काढू नयेत. दीर्घ व आलंकारिक वाक्यरचना करू नये. सोप्या शब्दांत आणि सुटसुटीत वाक्यांत उत्तरे लिहावीत.