मराठी व्याकरणाचे महत्व
व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व
भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात. भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय.
व्याकरण हा शब्द वि आ कृ (= करण) यांपासून बनला आहे. याचा शब्दश: अर्थ स्पष्टीकरण असा आहे. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय असे श्रीपाद भागवत यांनी म्हटले आहे.
महर्षी पतंजलींनी व्याकरणाला 'शब्दानुशासन' असे नाव दिलेले आहे. अनुशासन म्हणजे नियमन, शिस्त.
आपल्या भाषेतील शब्दातील वर्ण, त्यांचे उच्चार, शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्यातील पदांचे, शब्दांचे परस्परसंबंध इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण.
व्याकरण हे भाषेचे रचनास्वरूप आदर्श कसे असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र आहे. भाषास्वरुपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण असते. भाषा ही स्थलकालानुरूप बदलत जाते.
भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की भाषा वाक्यांनी बनते, वाक्य शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णानी बनतात.
व्याकरणाच्या अभ्यासाचे
१. वर्णविचार
२. शब्दविचार
३. वाक्यविचार असे घटक आहेत.
Comments
Post a Comment