शब्दांच्या शक्ती

शब्दांच्या शक्ती

अभिधा ( वाच्यार्थ )

अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात.  
उदाहरणार्थ   
१) साप मारायला हवा.  
२) मी एक लांडगा पाहिला.  
३) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.  
४) बाबा जेवायला बसले.  
५) घरात फार जळवा झाल्या आहेत.  
६) आम्ही गहू खरेदी केला.     

व्यंजना (व्यंगार्थ)      

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात.  
उदाहरणार्थ      
१) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.         
२) भुंकणारे कुत्रे चावत नसतात.       
३) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते.         
४) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत.        
५) घड्याळाने पाचचे ठोके दिले.     

लक्षणा (लक्षार्थ)   

शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात.  
ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.         
उदा.              
आम्ही ज्वारी खातो.  
याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.    
उदाहरणार्थ          
1) बाबा ताटावर बसले.      
2) घरावरून हत्ती गेला.       
3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.  
4) मी शेक्सपिअर वाचला.          
5) सूर्य बुडाला.        
6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या. 



Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार