केवल प्रयोगी अव्यय

केवलप्रयोगी अव्यय

आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
केवलप्रयोग अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न ठरवता ती अव्यये कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरते.
उदा:
अ) बापरे! तीन वाजले ! (आश्चर्य)
आ) अरेरे ! ही गोष्ट फार वाईट झाली. (दुःख)

केवलप्रयोगी अव्ययाचे पुढील प्रकार पडतात.

१. हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यये -

वा, वावा, आहा, ओहो, आ-हा, अहाहा.
उदा.
अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.

२. शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये :- 

ऊं, अँ, अरेरे, अयाई, अगाई, हायहाय, हाय.
उदा.
अरेरे! खूप वाईट झाले.

३. आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यये :-

ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, चक्चक्, अरेच्या.
उदा.
अबब! केवढी मोठी ईमारत.

४. प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये :-

शाबास, भले, वाहवा, यंव, छान, ठीक, फक्कड, खाशी.
उदा.
शाब्बास! तूला दिलेले काम तू पूर्ण केलेस.

५. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यये :-

हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा.
उदा.
अछा! जा मग

६. विरोधीदर्शक केवलप्रयोगी अव्यये :-

छे, छट्, हॅट, ऊः, उंहू, च, अंहं, छे छे.
उदा.
छे-छे! असे करू नकोस.

७. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यये :-

धिक्, थुः, शीs, इश्श, हुडुत, हुड, फुस्, हत्, छत, छी. 
उदा.
छी! ते मला नको.

८. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यये :-

अगे, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे.
उदा.
अहो! एकलत का ?

९. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यये :-

चुप, चिंप, गप, गुपचित.
उदा.
चुप! जास्त बोलू नको

व्यर्थ उद्गारवाची अव्यय

केवलप्रयोगी अव्यये सामान्यतः वाक्याच्या आरंभी येतात व भावना व्यक्त करतात पण काहीसे उद्गारासारखे वाटणारे शब्द वाक्याच्या मध्येही येतात.
उदाहरणार्थ
१. पण बेटे मन स्वस्थ राहीना.
२. मी आपला काय बोलणार ?
३. काल म्हणे मुलांनी गडबड केली.
४. येणार असेल तर येईन बापडा !
वरील वाक्यातील बेटे, आपला, म्हणे, बापडा हे शब्द कोणत्याही भावना व्यक्त करत नाहीत किंवा त्यांच्यामुळे अर्थातदेखील विशेष भर पडत नाही उलट वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने निरर्थक किंवा व्यर्थ हे शब्द येत असल्यामुळे अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतात.
बोलताना केवळ लकब म्हणून किंवा आठवनासे झाले म्हणून काही व्यक्तींच्या बोलण्यात पालूपदासारखे काही शब्द पुन्हापुन्हा येताना आढळतात जसे आता, बर का, जुळल मेल, आणखीन, कळल इतक, जेहेते, बरिक वगेरे अशा शब्दांना पापूरणार्थक केवलप्रयोगी अव्यये किंवा पालुपदे असे म्हणतात.



Comments

Post a Comment