प्रयोग व त्याचे प्रकार

प्रयोग

वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.  
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात.
कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला ‘णारा’ प्रत्यय लावून कोण? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.
वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्यापासून निघते व ती दुस-या कोणावर किंवा कशावर तरी घडते.  
त्या क्रियेचा परीणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्या क्रियेचे कर्म असते.
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.  
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही, त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

प्रयोगाचे प्रकार

मुख्य तीन प्रकार आहेत.
१. कर्तरी प्रयोग  
२. कर्मणी प्रयोग  
३. भावे प्रयोग

१.कर्तरी प्रयोग

जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरुपेश ( क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा ) असतो.  
उदा.
अ) तो चाय पितो. (कर्ता- पुल्लिंगी)
आ) ती चाय पिते. (कर्ता- लिंग)
इ) ते चाय पितात. (कर्ता- वचन)

कर्तरी प्रयोगाची खूण कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो व कर्म हे प्रथमांत किंवा व्दितीयांत असते. 

उदाहरणार्थ  
अ) मी शाळेतून आताच आलो.
आ) पोपट पेरू खातो.  
इ) शिक्षक मुलांना शिकवितात.
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :-

अ) सकर्मक कर्तरी प्रयोग :-

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.
उदा.  
अ) हितेश पाणी भरतो.
आ) प्रिया पाणी भरते.
इ) ते पाणी भरतात.
ई) ती गाणे गाते.  

आ) अकर्मक कर्तरी प्रयोग :-  

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.  
उदा.
अ) तो चालतो.
आ) ती चालते.
इ) ते चालतात.
ई) ती घरी जाते.

२.कर्मणी प्रयोग

क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमात असते. कर्ता प्रथमात कधीच नसतो. कर्ता तृतीयांत, चतुर्थेत, सविकरणी तृतीयांत किंवा शब्दयोगी अव्ययंत असतो.
उदाहरणार्थ  
अ) तिने गाणे म्हटले.  
आ) मला हा डोंगर चढवतो.  
इ) रामाच्याने काम करवते.  
ई) मांजराकडून उंदीर मारला गेला.
कर्मणी प्रयोगाचे प्रकार

१. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग -  

कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
या प्रयोगात क्रियापद लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो, त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.  
उदाहरणार्थ  
अ) तिने गाणे म्हटले.  
आ) मला हा डोंगर चढवतो.  
इ) त्याने काम केले.  
ई) तिने अभ्यास केला

२. शक्य कर्मणी प्रयोग – 

जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
रामाच्याने काम करवते या वाक्यात शक्यता सुचविलेली आहे यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा.  
अ) आई कडून काम करविते.
आ) भीमसेनला अजून गाणे म्हणवते.

३. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  :-

हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.        
प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करिजे, बोलिजे, कीजे, देईजे, अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पहावयास मिळतात. या प्रकारच्या प्रयोगास प्राचीन किंवा पुराण कर्मणी असे म्हणतात.  
उदाहरणार्थ  
त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने नळे इंद्रासी असे बोलिजेले  
जो जो कीजे परमार्थ लाहो विजी निशिधापासाव म्हणीजेलो

४. समापण कर्मणी प्रयोग :-

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
त्याची गोष्ट लिहून झाली या प्रकारच्या वाक्यात त्याची हा कर्ता षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाली या संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात.
उदा.  
अ) त्याचे पुस्तक वाचून झाले.
आ) रामाची गोष्ट सांगून झाली.

५. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग :-

ह्या प्रयोगात इंग्लिश मधील passive voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते.  
कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात.  
तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.
उदा.  
अ) रावण रामाकडून मारला गेला.
आ) चोर शिपयांकडून पकडला गेला.
इंग्रजीतील Passive Voice ला मराठीत कर्मकर्तरी असे म्हणतात.  
सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला जा या सहाय धातूची मदत देऊन हा प्रयोग करतात, कर्मकर्तरी ला काहीजण नवीन कर्मणी असे म्हणतात.  
जेंव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावयाचे असते किंवा कर्ता स्पष्ट नसतो किंवा कर्याचा उल्लेख टाळावयाचा असतो त्यावेळी हा प्रयोग सोयीचा असतो.  
उदाहरणार्थ  
अ) गाय गुराख्याकडून बांधिली जाते.  
आ) न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.  
इ )सभेत पत्रके वाटली गेली.  
ई) सर्वांना समज दिली जाईल.

३. भावे प्रयोग

जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात
जेंव्हा क्रियापदाचे रूप कत्र्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेंव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात.  
भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण असतात.
उदा.  
अ) संजयने गाईला पकडले.
आ) गीताने मुलांना मारले.   
भावे प्रयोगाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :-

१) सकर्मक भावे प्रयोग :-  

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा.  
अ) शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
आ) आईने मुलाला मारले.
इ) मांजराने उंदरास पकडले.

२) अकर्मक भावे प्रयोग :-

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा.  
अ) त्याने खेळावे.
आ) तिने जावे.

३) अकर्तुक भावे प्रयोग :-

भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसतो तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा.  
अ)आता उजाडले.
आ)गप्प बसावे.

भावे प्रयोगाची खुण -

१. कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थत असतो.  
उदाहरणार्थ  
रामाने रावणास मारले.
२. कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी वितिया विभक्ती असते.  
उदाहरणार्थ  
शिक्षकांनी विद्यार्थांना शिकवावे.  

३. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यर्थी असते.  

उदाहरणार्थ  
त्याने आता घरी जावे.

४. शक्यार्थक क्रियापदाचा नेहमीच भावे प्रयोग होतो.  

उदाहरणार्थ  
त्याला घरी जाववते.

भावकर्तरी प्रयोग

उदाहरणार्थ  
अ) मला आज मळमळते.  
आ) तो घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.  
इ) आज सतत गडगडते.  
ई) सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.  
वरील वाक्यातील क्रियापदांना कर्ते असे नाहीत. सर्वच वाक्यातील क्रियापदे तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत म्हणजे ती भावेप्रयोगी आहेत पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तुक भावे प्रयोग होय.  
अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग असेही म्हणतात.

मिश्र किंवा संकर प्रयोग

कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा आढळणाच्या वाक्यातील प्रयोगास कर्तु-कर्मसंकर प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ  
अ) तू मला पुस्तक दिलेस.  
अ) तू कविता म्हटलीस.  
आ) तुम्ही कामे केलीत.  
इ) तू लाडू खाल्लास.

कर्म भाव संकर प्रयोग

कर्मणी व भाचे प्रयोगाच्या छटा असणा-या वाक्यातील प्रयोगास कर्म भाव संकर भाव संकर प्रयोग असे म्हणतात.
उदाहणार्थ
अ) आईने मुलीला निजवले.  
आ) मी त्याला मुंबईस धाडले.

कर्तु भाव संकर प्रयोग

कर्तरी व भावे प्रयोगाच्या छटा असणा-या वाक्यातील प्रयोगास कर्तु भाव संकर प्रयोग असे म्हणतात.
उदाहरणार्थ  
अ) तू गाईला घालविलेस.  
आ) तू मला वाचविलेस.


              

Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार