संधी व त्याचे प्रकार
संधी
जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.
संधीचे प्रकार
१. स्वरसंधी:–
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात. स्वरसंधीचे स्वरूप स्वर स्वर असे असते.
उदाहरणार्थ:-
कवि + ईश्वर = कवीश्वर (इ + ई = ई)
२. व्यंजनसंधी: –
जवळजवळ येणा-या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.
उदाहरणार्थ:-
१. सत + जन = सज्जन
(त + ज) (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)
२. चित + आनंद = चिदानंद
(त + आ) (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)
३. विसर्गसंधी: –
एकत्र येणा-या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेंव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्ग व्यंजन किंवा विसर्ग स्वर असे त्याचे स्वरूप असते.
उदाहरणार्थ : -
१. तप: + धन = तपोधन (विसर्ग +ध)
२. दुः + आत्मा = दुरात्मा (विसर्ग + आ)
सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी -
दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.
सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ +अ = आ
१. सूर्य + अस्त = सूर्यास्त
२. कट + अक्ष = कटाक्ष
३. रूप + अंतर = रुपांतर
४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न
५. स + अभिनय = साभिनय
६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय
७. सह + अध्यायी = सहाध्यायी
८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ
९. सह + अनुभूती = सहानुभूती
१०. मंद + अंध = मंदांध
११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार
अ + आ = आ
१. देव + आलय = देवालय
२. हिम + आलय = हिमालय
३. फल + आहार = फलाहार
४. अनाथ + आश्रम = अनाथाश्रम
५. गोल + आकार = गोलाकार
६. मंत्र + आलय = मंत्रालय
७. शिशिर + आगमन = शिशिरागमन
८. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय
९. धन + आदेश = धनादेश
१०. जन + आदेश = जनादेश
११. दुख: + आर्त = दुखार्त
१२. नील + आकाश = नीलाकाश
१३. कार्य + आरंभ = कार्यारंभ
आ +अ = आ
१. विद्या + अर्थी = विद्यार्थी
२. विद्या + अमृत = विद्यामृत
३. भाषा + अंतर = भाषांतर
आ +आ = आ
१. महिला + आश्रम = महिलाश्रम
२. राजा + आश्रय = राजाश्रय
३. कला + आनंद = कलानंद
४. विद्या + आलय = विद्यालय
५. राजा + आज्ञा = राजाज्ञा
६. चिंता + आतुर = चिंतातुर
इ+ इ = ई
१. मुनी + इच्छा = मुनीच्छा
२. कवि + इच्छा = कवीच्छा
३. अभि + इष्ट = अभीष्ट
इ+ ई = ई
१. गिरि + ईश = गिरीश
२. कवि + ईश्वर = कवीश्वर
३. परि + ईक्षा = परीक्षा
ई+ इ = ई
१. गोमती + इच्छा = गोमतीच्छा
२. रवी + इंद्र = रवींद्र
३. मही+ इंद्र = महिंद्र
ई+ ई = ई
१. मही + ईश = महीश
२. पार्वती + ईश = पार्वती
उ +उ = ऊ
१. गुरु + उपदेश = गुरुपदेश
२. भानु + उदय = भानुदय
ऊ +उ = ऊ
१. भू + उद्धार = भूद्धार
२. वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष
३. लघू + उत्तरी = लघूत्तरी
ऋ+ ऋ = ऋ
१. मातृ + ऋण = मातृण
आदेश व गुणादेश-
संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला आदेश असे म्हणतात.
अ किंवा आ + इ किंवा ई = ए
अ किंवा आ + उ किंवा ऊ = ओ
अ किंवा आ + ऋ = अर
वरील प्रकारे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल झाल्यास याला गुणादेश असे म्हणतात.
गुणादेशाची उदाहरणे पुढीलप्रमाणे-
१. ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा
२. स्व + इच्छा = स्वेच्छा
३. लोक + इच्छा = लोकेच्छा
४. मनुष्य + इतर = मनुष्येत्तर
५. राष्ट्र + इतिहास = राष्ट्रेतिहास
६. गण + ईश = गणेश
७. राम + ईश्वर = रामेश्वर
८. गुण + ईश = गुणेश
९. महा + इंद्र = महेंद्र
१०. यथा + इष्ट = यथेष्ट
११. ज्ञान+ ईश्वर = ज्ञानेश्वर
१२. रमा + ईश = रमेश
१३. उमा + ईश = उमेश
१४. महा ईश = महेश
१५. अयोध्या + ईश = अयोध्येश
१६. राजा + ईश = राजेश
१७. लंका + ईश्वर = लंकेश्वर
१८. चंद्र + उदय = चंद्रोदय
१९. सूर्य + उदय = सूर्योदय
२०. पुरुष + उत्तम = पुरुषोत्तम
२१. अन्य + उक्ती = अन्योक्ती
२२. निसर्ग + उपचार = निसर्गोपचार
२३. गणेश + उत्सव = गणेशोत्सव
२४. प्रश्न + उत्तर = प्रश्नोत्तर
२५. दीर्घ + उत्तरी = दिर्घोतरी
२६. स्वभाव+ उक्ती = स्वभावोक्ती
२७. अल्प + उपहार = अल्पोपहार
२८. राष्ट्र + उत्तेजक = राष्ट्रोत्तेजक
२९. उत्तम + उत्तम = उत्तमोत्तम
३०. सह + उदर = सहोदर
३१. पर + उपकार = परोपकार
३२. नर उत्तम = नरोत्तम
३३. समुद्र + उर्मी = समुद्रोर्मी
३४. एक + ऊन = एकोन
३५. जल + उर्मी = जलोर्मी
३६. गंगा + उदक = गंगोदक
३७. महा + उत्सव = महोत्सव
३८. धारा + उष्ण = धारोष्ण
३९. गंगा + उर्मी = गांगोम
४०. सप्त + ऋषी = सप्तर्षी
४१. देव + ऋषी = देवर्षी
४२. ब्रम्ह + ऋषी = ब्रम्हर्षी
४३. महा + ऋषी = महर्षी
४४. राजा + ऋषी = राजर्षी
वृद्धयादेश -
अ किंवा आ + ए किंवा ए = ए , अ किंवा आ + ओ किंवा औ = औ वरील प्रकारे स्वर तयार झाल्यास यास वृद्धयादेश असे म्हणतात.
वृद्धयादेश याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. क्षण+ एक = क्षणेक
२. एक + एक = एकेक
३. सदा + एव = सदेव
४. मत + ऐक्य = मतेक्य
५. जन + ऐक्य = जनेक्य
६. प्रजा + ऐक्य = प्रजेक्य
७. विद्या+ ऐश्वर्य = विद्येश्वर्य
८. जल + औघ = जलौघ
९. गंगा + औघ = गंगौघ
१०. वृक्ष + औदार्य = वृक्षोदार्य
११. वन +औषधी = वनौषधी
१२. क्षमा +औचित्य = क्षमौचित्य
१३. यमुना + औघ = यमुनौघ
१४. बाल + औत्सुक्य = बालोत्सुक्य
१५. महा + औदार्य = महौदार्य
यणादेश -
इ, उ, ऋ (ह्रस्व किंवा दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास इ किंवा ई बद्दल य, उ किंवा ऊ बद्दल व , तर ऋ बद्दल र वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते अशा प्रकारे य, व, र असे बदल होतात त्याला यणादेश असे म्हणतात.
यणादेश याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. प्रीती + अर्थ = प्रीत्यर्थ
२. अति + अल्प = अत्यल्प
३. अति + अंत = अत्यंत
४. प्रती + अक्ष = प्रत्यक्ष
५. प्रती + अंतर = प्रत्यंतर
६. इति + आदी = इत्यादी
७. अति + आचार = अत्याचार
८. अति + आनंद = अत्यानंद
९. वि + आसंग = व्यासंग
१०. अति +उत्तम = अत्युतम
११. नदी + उद्गम = नदयुदगम
१२. प्रीती + एक = प्रत्येक
१३. किती + एक = कित्येक
१४. मनु +अंतर = मन्वंतर
१५. अनु + अर्थ = अन्वर्थ
१६. सु +अल्प = स्वल्प
१७. गुरु + आज्ञा = गुर्वाज्ञा
१८. हेतू +आभास = हेत्वाभास
१९. सु + आनंद = स्वानंद
२०. सु + आगत = स्वागत
२१. भानू +ईश्वर = सान्वीश्वर
२२. पितृ + आज्ञा = पित्राज्ञा
२३. पितृ + औदार्य = पित्रोदार्य
ए, ए, ओ, औं या स्वरांपुढे स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय, आय, अव, आव असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. ने + अन = नयन
२. गै +अन = गायन
३. गो + ईश्वर = गवीश्वर
४. नौ+ इक = नाविक
५. पो + अन = पवन
६. पौ + अन = पावन
व्यंजनसंधी
प्रथम व्यंजन संधी-
पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
प्रथम व्यंजन संधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे-
१. विपद + काल = विपत्काल
२. वाग + पति = वाक्पति
३. वाग + ताडन = वाक्ताडन
४. षड + शास्त्र = षटशास्त्र
५. क्षुध+ पिपासा = क्षुत्पिपासा
६. आपद + काल = आपत्काल
७. शरद + काल = शरत्काल
८. क्षुद + पीडा = क्षुत्पीडा
तृतीय व्यंजन संधी
पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.
तृतीय व्यंजनसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. वाक + विहार = वाग्विहार
२. षट + रिपू = षड्रिपू
३. सत+ आचार = सदाचार
४. उत + गम = उद्गम
५. उत + ध्वस्त = उदध्वस्त
६. सच्चित + आनंद = सच्चिदानंद
७. सत + वासना = सदवासना
८. विद्युत + दीप = विद्युदीप
९. भगवत + भक्ती = भगवदभक्ती
१०. अच + आदी = अजादी
११. अप + ज = अब्ज
१२. जगत + ईश्वर = जगदीश्वर
१३. षट + आनन = षडानन
१४. सत + भावना = सदभावना
१५. दिक + विजय = दिग्विजय
१६. भगवत + गीता = भगवद्गीता
१७. दिक + अंबर = दिगंबर
१८. दिक + गज = दिग्गज
१९. दिक + अंत = दिगंत
अनुनासिक संधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. षट + मास = षण्मास
२. जगत + नाथ = जगन्नाथ
३. सत + मत = सन्मती
४. चित + मय = चिन्मय
५. मत + माता= मन्माता
६. तत + मय = तन्मय
७. सत + मार्ग = सन्मार्ग
८. भगवत + नाम = भगवन्नाम
९. षठ + मुख = षण्मुख
१०. वाक + मय = वांग्मय
११. जगत + नियंता = जगन्नीयंता
१२. वाक + निरस = वांगनिरस
१३. वाक + निश्चय = वांगनिश्चय
१४. दिक + मूढ = दिंगमूढ
त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल ज होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. उत् + ज्वल = उज्ज्वल
२. सत + जन = सज्जन
३. जगत + जीवन = जगज्जीवन
४. यावत + जीवन = यावज्जीवन
५. शरत + झंझावत = शरज्झंझावत
त या व्यंजनापुढे ट किंवा ठ आल्यास त बद्दल ट होतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. तत + टीका = तटटीका
त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल येतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. उत लंघन = उल्लंघन
२. उत लेख = उल्लेख
३. तत लीन = तल्लीन
४. विद्युत लता = विद्युल्लता
त या व्यंजनापुढे श आल्यास त बद्दल च होतो व पुढील श बद्दल छ होतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. सत + शिष्य = सछीष्य
२. सल + शील = सछिल
३. मृत + शकटिक = मूच्र्छकटिक
४. उत्त + शिष्ट = उछीष्ट
त या व्यंजनापुढे ह आल्यास त बद्दल द होतो व पुढील व बद्दल ध होतो.
उदाहरणार्थ
१. तत + हित = तद्धित
म पुढे स्वर आल्यास तो म मध्ये मिसळतो परंतु व्यंजन आल्यास म चा लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. सम + आचार = समाचार
२. सम + गती = संगती
३. सम + आलोचन = समालोचन
४. सम + ताप = संताप
५. सम + तोष = संतोष
६. सम + मती = संमती
७. सम + योग = संयोग
८. सम + कर = संकर
९. सम + कल्प = संकल्प
१०. सम + बंध = संबंध
११. सम + पूर्ण = संपूर्ण
छ पूर्वी ह्रस्व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च हा वर्ण येतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. रत्न + छाया = रत्नचछाया
२. रंग + छटा = रंगचछटा
३. शब्द + छल = शब्दचछल
विसर्ग संधी
विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो याला विसर्ग उ कार संधी असे म्हणतात.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. यश: + धन = यशोधन
२. तेजः+ निधी = तेजोनिधी
३. मन: + राज्य = मनोराज्य
४. मनः + बल = मनोबल
५. मनः + रथ = मनोरथ
६. मनः + रंजन= मनोरंजन
७. रज:+ गुण = रजोगुण
८. यशः + गिरी = यशोगिरी
९. मनः + वृत्ती = मनोवृत्ती
१०. अधः+ वैदन = अधोवदन
११. तप: + बल = तपोबल
विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. याला विसर्ग र संधी असे म्हणतात.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. निः + अंतर = निरंतर
२. दुः + जन = दुर्जन
३. बहिः +अंग = बहिरंग
४. दुः + आत्मा = दुरात्मा
५. निः + विकार = निर्विकार
६. धनु: + विद्या = धनुर्विद्या
७. निः + इच्छा= निरिच्छा
८. निः + लोभ = निर्लोभ
९. दुः + व =दुर्दैव
१०. नि:+ उद्योग = निरूद्योग
११. दुः + वासन = दुर्वासन
१२. आशी: + वचन = आशीर्वचन
१३. दुः + गती = दुर्गती
१४. आयु: + वेद = आयुर्वेद
१५. धनु: + वात = धनुर्वात
विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क, ख, प, फ हे वर्ण आले तर विसर्गाचा र होऊन संधी होते.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. निः + कर्ष = निष्कर्ष
२. दुः + काळ = दुष्काळ
३. निः + कारण = निष्कारण
४. निः + पाप = निष्पाप
५. नि:+ फळ = निष्फळ
६. नि: + कपट = निष्कपट
७. दुः + कीर्ती = दुष्कीर्ती
८. बहिः+ कृत = बहिष्कृत
९. दुः + परीणाम = दुष्परिणाम
१०. बहिः+ कार = बहिष्कार
११. दुः + कर = दुष्कर
विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क, ख, प, फ हि कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. रज: + कण = रजःकण
२. प्रात:+ काल = प्रात:काल
३. अध: + पात = अध:पात
४. इत: + पर = इत:पर
५. तेजः + पुंज = तेज:पुंज
६. इत: + उत्तर = इत:उत्तर
७. अत + एव = अत:एव
पदाच्या शेवटी र येवून त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. अंतर + करण = अंत:करण
२. चतुर + सूत्री = चतुःसूत्री
पहिल्या पदाच्या शेवटी स येवून त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. मनस + पटल = मन:पटल
२. तेजस + कण = तेज:कण
विसर्गाच्या ऐवजी येणा-या र च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच राहून संधी होते.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. पुनर + जन्म = पुनर्जन्म
२. अंतर + आत्मा = अंतरात्मा
३. अंतर + गत = अंतर्गत
४. पुनर + उक्ती = पुनरुक्ती
५. पुनर + उच्चार = पुनरुच्चार
विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास विसर्गाचा श होतो. त किंवा थ आल्यास स होतो.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. नि: + चल = निश्चल
२. दुः + चिन्ह = दुश्चिन
३. मनः + ताप = मनस्ताप
४. नि: + तेज = निस्तेज
५. मन:+ चक्षु = मनश्चक्षु
विसर्गाच्या पुढे कृ धातूची रूपे असल्यास विसर्गाचा स होऊन संधी होते.
या नियमाची उदाहरणे पुढीलप्रमाणे
१. नमः + कार = नमस्कार
२. पूरः + कार = पुरस्कार
३. वय:+ कर = वयस्कर
४. भा:+ कर = भास्कर
५. तिरः + कार = तिरस्कार
मराठीतील विशेष संधी
पूर्वरूपसंधी –
कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणा-या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो याला पूर्वरूपसंधी म्हणतात.
पूर्वरूपसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. नाही + असा = नाहीसा
२. नदी + आत = नदीत
३. साजे + असा = साजेसा
४. आळी + आत = आळीत
५. खिडकी + आत = खिडकीत
६. चांगले + असे = चांगलेसे
७. लाडू + आत = लाडूत
पररूपसंधी –
काही मराठीतील शब्दांची संधी होताना एकत्र येणा-या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो अशा प्रकारच्या संधीला पररूपसंधी असे म्हणतात.
पररूपसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. हात + ऊन = हातून
२. न + उमजे = नुमजे
३. एक + एक = एकेक
४. भरड + ऊन = भरडून
५. चिंधी + ओटी = चिंधोटी
६. हर + एक = हरेक
७. घर + ई = घरी
दीर्घ स्वरापुढे येणा-या स्वराची मागील स्वराशी बहुतेककरून संधी होत नाही.
उदाहरणार्थ :-
१. जा + ऊन= जाऊन
२. हो + ऊ = होऊ
३. घे + ईल = घेईल
'ही' हे शब्दयोगी अव्यय मागील संख्याविशेषणाबरोबर संधी होताना दोन प्रकारे लिहिले जाऊ शकते.
उदाहणार्थ :-
१. दोन + ही = दोन्ही/दोनी
२. चार + ही = चारही/चारी
अनुस्वार, अनुरूप या शब्दांबरोबर संधी होताना मागील शब्दाचे सामान्यरूप होते.
उदाहणार्थ :-
१. पद्धत + अनुसार = पद्धतीनुसार
२. गरज + अनुसार = गरजेनुसार
३. विषय + अनुरूप = विषयानुरूप
मराठीतील काही इतर संधी
१. गेली + आहे = गेलीहे/गेलीय
२. बसला +आहात = बसलात/बसलाआहात
३. येतो + आहे = येतोहे/येतोय
सन्मती या शब्दची संधी तुमच्या चार्ट मध्ये नहि Plz आम्हाला त्याची संधी सांगा .
ReplyDeleteSam + ati= sanmati
ReplyDeleteBhakti
ReplyDeleteSandhi sodwa
Vichar
ReplyDeleteSandhi sodwa
शरद+चंद्र याची संधी सांगा
ReplyDeleteशरत+चंद्र आहे ते त्याचे उत्तर शरच्चंद्र होत
Delete