समास

समास    

काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो.
बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो यालाच समास असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.              
शब्दांच्या एकत्रीकरनास समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात.    
फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय.      
उदाहरणार्थ    
१. वनभोजन हा सामासिक शब्द असून ‘वनातील भोजन' हा त्याचा विग्रह होय.
२. वडापाव - वडाघालून तयार केलेला पाव.      
३. पोळपाट - पोळी करण्यासाठी लागणारे पाट
४. कांदेपोहे - कांदे घालून तयार केलेले पोहे.     
५. पंचवटी  - पाच वडांचा समूह        

समासाचे प्रकार       

समासात कमीत कमी दोन पदे किंवा शब्द एकत्र येतात. दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्व म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलावयाचे असते यावरून समासाचे पुढील प्रकार पडतात.     
समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.  
१. अव्ययीभाव समास - पहिले पद प्रमुख           
२. तत्पुरुष समास - दुसरे पद प्रमुख    
३. द्वंद्व समास - दोन्ही पदे महत्वाची       
४. बहुव्रीहि समास - दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिस-याच पदाचा बोध      

अव्ययीभाव समास    

या सामासालाच प्रथमपदप्रधान समास असे म्हणतात. जेंव्हा समासातील पहिले पद बहुधा महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेंव्हा अव्ययीभाव समास होतो.   
उदाहरणार्थ  
१. आजन्म - जन्मापासून
२. यथाशक्ती - शक्तीप्रमाणे
३. प्रतिदिन - प्रत्येक दिवशी 
४. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला  
अव्ययीभाव या समासाची आणखी उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.  
दररोज, हरहमेश, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालुम, गैरहजर, गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली इत्यादी.    

तत्पुरुष समास

ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.     
ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.    
थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.          
उदा.            
१. महामानव - महान असलेला मानव
२. राजपुत्र - राजाचा पुत्र
३. तोंडपाठ - तोंडाने पाठ
४. गायरान - गाईसाठी रान
५. वनभोजन - वनातील भोजन             
वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात  
तत्पुरुष समासातील दोन्ही पदे कधी कधी विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात यास सामानाधीकरण तत्पुरुष समास असे म्हणतात.     
उदाहरणार्थ     
काळमांजर - काळे असे मांजर       
तत्पुरुष समासातील दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात यास व्याधीकरण तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदाहरणार्थ
देवपूजा - देवाची पूजा

तत्परुष समासाचे प्रकार -      

अ) विभक्ती तत्पुरुष समास         

ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणा-या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास बिभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.              
या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसन्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्तीप्रत्ययाने दाखविला जातो त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते.          
ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.       
उदा     
१. गुनहीन - गुणाने हीन - तृतीया तत्पुरुष  
२. विधाभ्यास - विधेचा भास - षष्ठी तत्पुरुष
३. कर्मकुशल - कर्मात कुशल - सप्तमी तत्पुरुष          
वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.     

आ) अलक तत्पुरुष समास      

ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्तीप्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.          
ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.             
उदा.         
१. तोंडीलावणे.
२. पाठी घालणे           
या समासाची संस्कृत भाषेतील उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत –         
अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरूह, सरसिज इत्यादी.  

इ) उपपद तत्पुरुष समास  

ज्या तत्पुरुष समासातील दुसरी पदे ही धातुसाधिते किंवा कृदन्ते आहेत व ती अशी आहेत कि त्यांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद किंवा कदंत तत्पुरुष समास असे म्हणतात.         
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात. 
उदाहरणार्थ     
ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, विज, विहग, शेषशायी, देशस्थ, मनुज, नृप, सुखद, पयोद, खग, नग, सुज्ञ, कृतघ्न, शेतकरी, कामकरी, आगलाव्या, भाजीविक्या, वाटसरू इत्यादी,       
पंकेरूह, सरसिज यासारखे संस्कृत सामासिक शब्द व मळेकरी, पहारेकरी, पाखरेविक्या, गळेकापू यासारखे मराठी सामासिक शब्द हे अलुक व उपपद तत्पुरुष अशा दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत.      
यातील पहिल्या पदातील विभक्तीचा लोप झाला नाही म्हणून ते अलुक व त्यातील दुसरी पदे धातूसाधिते आहेत म्हणून ते उपपद तत्पुरुष अशा समासांना उभय-तत्पुरुष असेही म्हणतात.           
आणखी काही उदाहरणे :  
लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ,कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु इ.     

ई) नत्र तत्पुरुष समास       

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.            
म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना  नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.   
उदा.
अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.                
उदाहरणार्थ     
अपुरा, नास्तिक, अयोग्य, अनादर, नापसंत, अनाचार, अन्याय, अहिंसा, निरोगी, नाइलाज, नाउमेद, बेडर, गैरहजर इत्यादी         

उ) कर्मधारय समास        

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेंव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात.           
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.        
उदाहरणार्थ           
१. नील कमल - नील असे कमल   
२. रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
३. पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष  
४. महादेव - महान असा देव           

कर्मधारय समासाचे पोटप्रकार

१. विशेषण पूर्वपद –        

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.            
उदा.         
१. महादेव - महान असा देव
२. लघुपट - लहान असा पट   
३. रक्तचंदन - रक्तासारखे चंदन             

२. विशेषण उत्तरपद –          

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात.             
उदा.           
१. पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष  
२. मुखकमल - मुख हेच कमल  
३. वेशांतर - अन्य असा वेश
४. भाषांतर - अन्य अशी भाषा           

३. विशेषण उभयपद –            

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात.        
उदा.            
१. लालभडक - लाल भडक असा
२. श्यामसुंदर - श्याम सुंदर असा  
३. काळाभोर - काळा भोर असा              

४. उपमान पूर्वपद –        

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.              
उदा.               
१. वज्रदेह - वज्रासारखे देह
२. चंद्रमुख - चंद्रासारखे मुख  
३. राधेश्याम - राधेसारखा शाम   
४. कमलनयन - कमळासारखे नयन               

५. उपमान उत्तरपद –        

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.    
उदा.                
१. मुखचंद्र - चंद्रासारखे मुख  
२. नरसिंह - सिंहासारखा नर  
३. चरणकमल - कमलासारखे चरण
४. हृदयसागर - सागरासारखे चरण             

६) अव्यय पूर्वपद कर्मधारय -         

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.     
उदा.               
१. सुयोग - सु (चांगला) असा योग
२. सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
३. सुगंध - सु (चांगला) असा गंध                

७) रूपक कर्मधारय -         

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.              
उदा.                
१. विद्याधन - विद्या हेच धन   
२. यशोधन - यश हेच धन  
३. तपोबल - ताप हेच बल
४. काव्यांमृत - काव्य हेच अमृत           

८) व्दिगू समास :-      

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय कर्मधारय समास असेही म्हणतात. व्दिगू समासाला संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात.         
उदा.  
१. सप्ताह - सात दिवसांचा समूह           
२. पंधरवडा - पंधरा दिवसांचा समूह          
इतर उदाहरण-              
पंचवटी, नवरात्र, चातुर्मास, त्रिभुवन, सप्ताह, त्रिदल, पंचषाळे, चौघडी, त्रैलोक्य, बारभाई, पंचारती इत्यादी.         

९) मध्यमपदलोपी समास               

ज्या सामासिक शब्दातील पाहिल्या पदाचा दुस-या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात.       
उदा.
१. घोडेस्वार - घोडयावर असलेला स्वार         
२. चुलतभाऊ - चुलत्याकडून भाऊ       
आणखी उदाहरणे पुढीलप्रमाणे         
डाळवांगे, पुरणपोळी, लंगोटीमित्र, भोजनभाऊ, घोडेस्वार, कांदेपोहे, साखरभात, चुलतसासरा, मावसभाऊ, बालमित्र, गुळांबा, मामेभाऊ, बटाटेभात, नातसून इत्यादी   

व्दंव्द समास :-     

ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास व्दंव्द  समास असे म्हणतात.
आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात.          
उदा.          
१. मामामामी - मामा आणि मामी         
२. पापपुण्य - पाप आणि पुण्य          
आणखी उदाहरणे पुढीलप्रमाणे             
रामलक्ष्मण, पापपुण्य, विटीदांडू      
व्दंव्द समासाचे प्रकार पुढीलप्रमाणे   

अ) इतरेतर व्दंव्द समास :-    

ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.       
उदा.           
१. नेआण - ने आणि आण            
२. पशुपक्षी - पशु आणि पक्षी           
आणखी उदाहरणे पुढीलप्रमाणे           
आईबाप, हरिहर, स्त्रीपुरुष, अहिनकुल, एकवीस, कृष्णार्जुन, बहीणभाऊ इत्यादी            

आ) वैकल्पिक व्दंव्द समास :-        

ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.        
उदा.         
१. लहानमोठा - लहान किंवा मोठा      
२. न्यायान्याय - न्याय अथवा अन्याय         
आणखी उदाहरणे पुढीलप्रमाणे      
खरेखोटे, तीनचार, बरेवाईट, पासनापास, पापपुण्य, धर्माधर्म, न्यायान्याय, सत्यासत्य इत्यादी             

इ) समाहार व्दंव्द समास :-           

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. 
उदा.        
१. गाईगुरे - गाई, गुरे वगैरे        
२. पानसुपारी - पान, सुपारी व इतर पदार्थ         
आणखी उदाहरणे पुढीलप्रमाणे          
मीठभाकर, चहापाणी, भाजीपाला, अंथरूनपांघरून     

बहुव्रीही समास           

बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिस-याच पदाचा बोध होतो, हा सामासिक शब्द त्या तिस-या पदाचे विशेषण असते.      
ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.              
उदा.        
१. लंबोदर - लंब आहे उदर ज्याचे असा (गणपती)        
२. नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)             

बहुव्रीही समासाचे प्रकार

बहुव्रीही समासाचे चार उपपक्रार पडतात ते पुढीलप्रमाणे :-

१. विभक्ती बहुव्रीही    

ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.            
उदा.             
१. गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो        
२. भीमादी - भीम आहे आदी ज्यात असे ते      
विभक्ती बहुव्रीही समासाचे प्रकार        

अ. समानाधीकरण बहुव्रीही समास –        

बहुव्रीही समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत          
उदा.      
१) लक्ष्मीकांत -लक्ष्मी आहे कांता ज्याची - विष्णू (प्रथमा)         
२) वक्रतुंड - वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो - गणपती (प्रथमा)  
३) नीलकंठ - नील आहे कंठ ज्याचे तो - शंकर (प्रथमा) 
४) भक्तप्रिया - भक्त आहे प्रिय जयला तो - देव (प्रथमा)  
५) जितेंद्रिय - जीत आहेत इंद्रिय ज्याने तो - मारुती (प्रथमा)   
६) पांडुरंग - पांडूर आहे रंग ज्याचे असा तो - विठ्ठल (प्रथमा)         

आ. व्याधीकरण         

बहुव्रीही समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत            
उदाहरणार्थ          
१) सुधाकर - सुधा आहे करत असा तो - (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी)         
२) गजानन - गजाचे आहे आनन ज्याला तो - (गणेश) (षष्ठी/ प्रथमा)          
३) भालचंद्र - भाळी आहे चंद्र ज्याच्या तो - (शंकर) (सप्तमी/ प्रथमा)        
४)चक्रपाणी - चक्र आहे पानीत असा तो - ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी)       

२. नत्र बहुव्रीही समास         

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.         
बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि असे नकारदर्शक असेल तर त्यास नत्रबहुव्रीही समास असे म्हणतात.    
उदाहरणार्थ       
१) अव्यय- नाही व्यय ज्याला ते      
२) अनंत - नाही अंत ज्याला ते         
३) निर्धन - गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो       
४) निरास - नाही रस ज्यात ते        
५) नाक - नाही एक (दु:ख) ज्यात ते      
६) अनादी - नाही आदी ज्याला तो            
७) अखंड - नाही खंड ज्याला असे ते              
८) अनियमित - नियमित नाही असे ते         
९) अनाथ - जयला नाथ नाही असा तो         
१०) अनादी - नाही आदी ज्याला असा तो             
११) निर्बळ - निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो     
१२) निर्बुद्ध - ज्याला बुद्धी नाही असा तो            
१३) अकर्मक - नाही कर्म जयला असे ते       
१४) नास्तिक - नाही आस्तिक असा तो        
१५) निरोगी - नाही रोग ज्याला तो           

३. सहबहुव्रीही समास       

बहुव्रीही समासाचे पहिले पद सह असे असून तो सामासिक शब्द विशेषण असल्यास त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात.
ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.       
उदा.
१) सदर - आदराने सहित असा तो
२) सफल - फळाने सहित असे ते
३) सवर्ण - वर्णासहित असा तो
४) सहपरिवार - परिवारासहित असा तो
५) सबल - बलाने सहित असा तो     

४. प्रादीपबहुव्रीही समास      

बहुव्रीही समासाचे पहिले पद जर प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानि युक्त असेल तर त्यास प्रादीपबहुव्रीही समास असे म्हणतात.        
उदाहरणार्थ          
१) सुमंगल - पवित्र आहे असे ते
२) दुर्गुणी - गुणापासून दूर असलेला
३) प्रबळ - अधिक बलवान असा तो
४) विख्यात - विशेष ख्याती असलेला तो    

समासाविषयी काही महत्वाचे       

१. व्दंव्द व तत्पुरुष समस्त असलेले शब्द नामे किंवा विशेषण असतात.  
२. अव्ययीभाव असलेला शब्द क्रियाविशेषण असतो.  
३. बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषण असतो.




Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार