वचन

वचन

नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. एक आहे की अनेक आहेत ती संख्या बोध सूचक गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.  
मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात. 
मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रुपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रुप बदलत नाही.
मराठीत दोन वचनें मानतात.     

१. एकवचन  

२. अनेकवचन      

एकवचन -    

जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.  
उदा.  
मासा, गाय, फूल, मुलगा इ.      

अनेकवचन -

जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. 
उदा.     
मासे, गाई, फुले, मुलगे इ.  
वचनभेदामुळे नामांच्या रुपात होणारा बदल

आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते.

एकवचनअनेकवचन  
कुत्राकुत्रे  
आंबाआंबे
घोडाघोडे  
ससाससे  
रस्तारस्ते  
लांडगालांडगे  
मुलगामुलगे
फळाफळे
राजाराजे

आकारांतशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.      

एकवचनअनेकवचन  
देवदेव
उंदीरउंदीर
कवीकवी
शत्रूशत्रू
लाडूलाडू
कागदकागद
तेलीतेली
गहूगहू
मधमध

स्त्रीलिंगी नामांची अनेकवचने

आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कधी आकारांत होते तर कधी ईकारांत होते.

एकवचनअनेकवचन  
वेळवेळा  
वीटविटा  
चूकचुका
केळकेळी  
भिंतभिंती  
तारीखतारखा
विहीरविहिरी  
म्हेसम्हशी  
सूनसुना

य नंतर ई आल्यास उच्चारात य चा लोप होतो.

उदाहरणार्थ  
गाय - गायी - गाई, 
सोय - सोयी - सोई इत्यादी

आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते.

एकवचनअनेकवचन
भाषाभाषा
दिशादिशा
पूजापूजा
आज्ञाआज्ञा
सभासभा
विद्याविद्या

ईकारांत नामाचे अनेकवचन याकारांत होते ( अपवाद - दासी, दृष्टी इत्यादी )    

एकवचनअनेकवचन
नदीनद्या  
बीबिया  
स्त्रीस्त्रिया
काठीकाठ्या  
भाकरीभाक-या
लेखणीलेखण्या  

उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते ( अपवाद - वाळू, वस्तू, बाजू )   

एकवचनअनेकवचन
सासूसासवा
जाऊजावा  
जळूजळवा
ऊवा
पिसूपिसवा

एकारांत आणि एकारांत स्त्रीलिंगी शब्दांची रूपे आ - या कारांत होतात.

उदाहरणार्थ
पै - पया     
प्रचारात असलेला ओकारांत स्त्रीलिंगी शब्द बायको असून त्याचे अनेकवचन बायका असे होते.  

नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने      

अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते.

एकवचनअनेकवचन
घरघरे  
दारदारे
फुलफुले  
शेतशेते
माणूसमाणसे  
घड्याळघड्याळे  

ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते व विकल्पाने य हा आदेश होतो. (अपवाद - पाणी, लोणी, दही, अस्थी )

एकवचनअनेकवचन
मोतीमोत्ये
मिरीमिर्ये  

उकारांत आणि ऊकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते क्वचित प्रसंगी ते वेकारांत होते.

एकवचनअनेकवचन
पाखरूपाखरे  
वासरूवासरे
लिंबूलिंबे  
पिलूपिले
गळूगळवे  
आसूआसवे

एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ईकारांत होते. (अपवाद - सोने, रूपे, तांबे, शिसे यांची अनेकवचने एकवचनाप्रमाणे राहतात.)          

एकवचनअनेकवचन
केळेकेळी
गाणेगाणी  
मडकेमडकी  
कुत्रेकुत्री
खेडेखेडी
रताळेरताळी

आकारांत , एकारांत व ओकारांत नपुंसकलिंगी नामे मराठीत नाहीत.      

वचनासंबंधी विशेष गोष्टी

१. नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामांची अनेकवचने होतात. विशेषनामांची व भाववाचक नामांची अनेकवचने होत नाहीत.

२. कधी कधी व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्दल आदर दाखविण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल अनेकवचनी प्रयोग करतो.

उदाहरणार्थ
१. गुरुजी आताच शाळेत आले.  
२. मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहेत.          
अशा वेळी त्यास आदरार्थी अनेकवचन किंवा आदरार्थी बहुवचन असे म्हणतात. असा आदर दाखविण्यासाठी राव, जी, पंत, साहेब, महाराज यासारखे शब्द जोडतात.       
उदाहरणार्थ  
गोविंदराव, विष्णुपंत, गोखलेसाहेब इत्यादी.    
स्त्रियांच्या नावासमोर बाई, ताई , माई, आई, काकू इत्यादी शब्द येतात.  
उदाहरणार्थ  
राधाबाई, शांताबाई, जानकीकाकू इत्यादी       

३. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.

उदाहरणार्थ  
डोहाळे, कांजिण्या, शहारे , क्लेश, हाल, रोमांच इत्यादी. 

४. विपुलता दाखविण्यासाठी काही शब्दांचे एकवचन वापरतात.

उदाहरणार्थ
१. यंदा-खुप आंबा पिकला, 
२. शेटजींच्या जवळ खूप पैसा आहे, 
३. पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते.      

५. जोडपे, त्रिकुट, आठवडा, पंचक, डझन, शत, सहस्त्र, लक्ष, कोटी या शब्दांमधून अनेकत्वाचा बोध होतो, तरीही तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते एकवचनी वापरले जातात.  

अनेक गट मानले तर मात्र अनेकवचनी वापरतात. तसेच ढीग, रास, समिती, मंडळ, सैन्य वगेरे शब्दांतील समूह हा एकच मानला जात असल्यामुळे ती एकवचनी ठरतात. मात्र समूह अनेकवचनी मानले तर ते अनेकवचनी ठरतात 

६. अधिक सलगी किंवा जवळीक दाखवायची असेल तेव्हा मोठ्या व्यक्तींबाबतही एकवचन वापरण्यात येते.   

उदाहरणार्थ  
१. दादा शाळेतून आला.  
२. वाहिनी उद्या येणार आहे.  
३. बाबा गावाला गेला.




Comments

  1. दृष्टी या शब्दाचे अनेक वाचन काय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

जोड शब्द व त्याचे अर्थ