पदपरीस्पोट किंवा व्याकरण चालवणे

पदपरिस्फोट / व्याकरण चालवणे

'शब्दांचे व्याकरण चालविणे’ म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय.  
आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम,किंवा सर्वनाम त्यांना होणा-या लिंग, वचन, विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ, अर्थ, प्रयोग, यांची संपूर्ण माहिती मिळविली.  
या माहितीच्या ‘शब्दाचे व्याकरण चालविणे’ यासाठी उपयोग होतो. यालाच 'पदपरिस्फोट' असेही कोणी म्हणतात.

१) नामाचे व्याकरण चालवणे :-

नाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.
उदा.
१) त्यांनी घराला रंग दिला.
घराला :- मूळ शब्द - घर, 
प्रकार - नाम, 
पोटप्रकार - सामान्यनाम, 
लिंग - नपुंसकलिंग, 
वचन - एकवचन, 
विभक्ती - चतुर्थी, 
विभक्तीचा अर्थ - संप्रदान, 
वाक्यातील स्थान - दिला या क्रियापदाचे अप्रत्यक्ष कर्म.

२) सर्वनामाचे व्याकरण चालवणे :-

सर्वनाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.
उदा.  
१) मी स्वत: एक कविता केली आहे.
स्वत: :- मूळ शब्द - स्वत:, 
प्रकार - सर्वनाम, 
पोटप्रकार - आत्मवाचक सर्वनाम, 
लिंग - उभयलिंगी, 
वचन - एकवच, 
विभक्ती - प्रथमा, 
विभक्तीचा अर्थ - कर्ता, 
वाक्यातील स्थान - कर्ता.

३) विशेषणाचे व्याकरण चालवणे :-

विशेषण :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, कोणत्या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) माहिती देते ते विशेष्य.
उदा.  
१) बागेत चार माळी काम करत होते.
चार :- मूळ शब्द - चार, 
प्रकार - विशेषण, 
पोटप्रकार - संख्याविशेषण.  
माळी या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) विशेष माहिती देते.

४) क्रियापदाचे व्याकरण चालवणे :-

क्रियापद :- मूळ धातू, क्रियापदाचा प्रकार, रूप, अर्थ, काळ, लिंग, वचन, पुरुष, वाक्याचा प्रयोग.
उदा.  
१) संतोष अभ्यास करत होता.
करत होता :- मूळ धातू - कर, 
क्रियापदाचा प्रकार - संयुक्त क्रियापद, 
रूप - करुणरूप,
अर्थ - स्वार्थ, 
काळ - अपूर्ण भूतकाळ, 
लिंग - पुल्लिंग, 
वचन - एकवचन, 
पुरुष - तृतीय पुरुष, 
प्रयोग - कर्तरी.

५) अव्ययांचे व्याकरण चालवणे :-

अव्यय :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, असल्यास काही विशेष माहिती.
उदा.
१) मी  माझा भाऊ रोज देवाला नमस्कार करतो.
व :- मूळ शब्द - व, 
प्रकार - उभयान्वयी अव्यय, 
पोटप्रकार - समुच्चयबोधक, 
'मी' , 'भाऊ' या दोन शब्दांना जोडणारे.


        

Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार